‘इसिस’विरुद्ध लढण्यास नाटो देश सहमत
By admin | Published: September 7, 2014 02:30 AM2014-09-07T02:30:13+5:302014-09-07T02:30:13+5:30
आयएसआयएसच्या नेतृत्वाखालील इस्लामिक स्टेटचा, अर्थात इसिसचा आपल्याला मोठा धोका आहे, यावर अमेरिकेसह नाटो देश सहमत झाले आहेत.
Next
न्यूपोर्ट (ब्रिटन) : आयएसआयएसच्या नेतृत्वाखालील इस्लामिक स्टेटचा, अर्थात इसिसचा आपल्याला मोठा धोका आहे, यावर अमेरिकेसह नाटो देश सहमत झाले आहेत. या संघटनेच्या आर्थिक नाडय़ा आवळण्यासह प्रसंगी सैन्यबळाचा वापर करण्याचा मनोदयही नाटोने व्यक्त केला आहे.
‘इसिस’च्या दहशतवाद्यांचा पूर्व सिरिया, उत्तर व पश्चिम इराकमध्ये जोर वाढत आहे. या पाश्र्वभूमीवर सिरियातील बशर अल सरकार मात्र बंडखोर व दहशतवादी समूहाविरुद्ध लढण्यात अपयशी ठरत आहे, असा आरोप अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केला.
ओबामा म्हणाले, दहशतवादी कारवायांना चिरडण्यासाठीच्या एका दीर्घकालीन मोहिमेत नाटोची नवी टीम यशस्वी होईल. इसिसद्वारे प्रसारित केला जात असलेला ‘निषेधवाद’ फेटाळून लावण्याचे आवाहन ओबामा यांनी अरब सहका:यांना केले. दहशतवादी समूहांविरुद्ध कारवाई करण्याचा निर्धार नाटो नेत्यांनी या बैठकीत केला. ‘इसिस’ला पराभूत करण्याचे आवाहन ओबामा यांनी नाटो देशांना केले.
अमेरिकी परराष्ट्रमंत्री व संरक्षणमंत्री यांनी या आंतरराष्ट्रीय परिषदेत विविध देशांच्या समपदस्थांशी बातचीत केली. यावेळी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेची या महिन्यात बैठक होणार असून यात दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी एक योजना तयार करण्यावर अमेरिकेकडून भर देण्यात आला. (वृत्तसंस्था)
अमेरिका लढणार नऊ सहका:यांच्या मदतीने
च्ओबामा इसिसला चिरडून काढण्यासाठी 9 सहकारी देशांसह मोहीम चालविणार आहेत. उल्लेखनीय म्हणजे, दशकभरापूर्वी जॉर्ज बुश यांनीही दहशतवादविरोधातील युद्धात याच तंत्रचा वापर केला होता.
च्ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी, तुर्की, इटली, पोलंड आणि डेन्मार्क या नऊ देशांच्या मदतीने अमेरिका इसिसविरोधी मोहीम राबविणार आहे.