नाटो होर्मुझमध्ये उतरणार? मार्क रुट्टे यांनी ट्रम्प नाराज असल्याचे केले मान्य; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 08:34 IST2026-03-23T08:34:01+5:302026-03-23T08:34:32+5:30

NATO Strait of Hormuz Support : इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यानंतर नाटो प्रमुख मार्क रुट्टे यांचा डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा. २० हून अधिक देश एकत्र येऊन सागरी मार्ग खुला करणार? वाचा सविस्तर बातमी.

NATO Strait of Hormuz Support: Will NATO land in Hormuz? Mark Rutte admits Trump is upset; said... | नाटो होर्मुझमध्ये उतरणार? मार्क रुट्टे यांनी ट्रम्प नाराज असल्याचे केले मान्य; म्हणाले...

नाटो होर्मुझमध्ये उतरणार? मार्क रुट्टे यांनी ट्रम्प नाराज असल्याचे केले मान्य; म्हणाले...

अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धामुळेइराणने जगातील सर्वात महत्त्वाचा सागरी मार्ग 'होरमुझची सामुद्रधुनी' रोखली असून, यामुळे जागतिक तेल व्यापारावर मोठे संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर, नाटोचे सरचिटणीस मार्क रुट्टे यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेला जाहीर पाठिंबा दिला आहे. होर्मुझचा मार्ग पुन्हा खुला करण्यासाठी इतर देश दाखवत असलेल्या सुस्तीबद्दल ट्रम्प नाराज असल्याचेही रुट्टे यांनी मान्य केले आहे.

मार्क रुट्टे यांनी 'फॉक्स न्यूज'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, त्यांनी या आठवड्यात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी अनेकदा चर्चा केली आहे. ट्रम्प यांची इच्छा आहे की त्यांच्या मित्रदेशांनी या महत्त्वाच्या सागरी मार्गाला सुरक्षित करण्यासाठी अधिक सक्रिय भूमिका बजावावी. ट्रम्प यांचा हा दबाव आता रंग आणत असून, शिपिंग चॅनेलचे कामकाज पूर्ववत करण्यासाठी आता २० हून अधिक देश एकत्र येत आहेत, असा दावाही रुट्टे यांनी केला आहे.

इराणवरील हल्ल्यांचे समर्थन
नाटो प्रमुखांनी अमेरिकेने इराणवर केलेल्या लष्करी हल्ल्यांचे जोरदार समर्थन केले आहे. जागतिक सुरक्षेसाठी हे पाऊल उचलणे गरजेचे होते, असे सांगताना त्यांनी इराणच्या अणू आणि बॅलिस्टिक मिसाइल कार्यक्रमावर निशाणा साधला. आंतरराष्ट्रीय शांतता टिकवून ठेवण्यासाठी या धोक्यांचा मुकाबला करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

होर्मुझचे महत्त्व आणि संकट
होर्मुझची सामुद्रधुनी हा जगातील तेल व्यापारासाठी सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे, जो सध्या इराणी सैन्याने युद्धादरम्यान बंद केला आहे. सहयोगी देशांना एकत्र आणणे हे या मिशनच्या यशासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे रुट्टे यांनी म्हटले आहे.

Web Title : क्या नाटो होर्मुज में हस्तक्षेप करेगा? रुट्टे ने ट्रम्प की नाराजगी स्वीकारी।

Web Summary : नाटो के रुट्टे ने होर्मुज जलडमरूमध्य पर ट्रम्प के रुख का समर्थन किया, जो तेल व्यापार के लिए महत्वपूर्ण है। उन्होंने स्वीकार किया कि ट्रम्प सहयोगियों की धीमी प्रतिक्रिया से निराश हैं, अब 20 राष्ट्र प्रयासों में शामिल हो रहे हैं। रुट्टे ने ईरान के खिलाफ अमेरिकी कार्रवाइयों का भी समर्थन किया, परमाणु और मिसाइल खतरों का हवाला दिया।

Web Title : NATO to intervene in Hormuz? Rutte acknowledges Trump's displeasure.

Web Summary : NATO's Rutte supports Trump's stance on Hormuz Strait, crucial for oil trade. He admits Trump is frustrated by allies' slow response to secure the route, now with 20 nations joining efforts. Rutte also backed US actions against Iran, citing nuclear and missile threats.