जागतिक सुरक्षिततेसाठी चीन धोकादायक, NATO देशांनी व्यक्त केली चिंता; ड्रॅगननं दिलं असं उत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 07:43 PM2021-06-15T19:43:28+5:302021-06-15T19:44:47+5:30

नुकत्याच ब्रुसेल्स येथे झालेल्या नाटो शिखर परिषदेतील नेत्यांनी म्हटले होते, की चीन जागतिक सुरक्षिततेसाठी धोनादायक बनला आहे. एवढेच नाही, तर चीन आंतरराष्ट्रीय नियमांवर आधारलेल्या व्यवस्थेला कमकूवत करण्याचे काम करत आहे, असेही नाटोने आपल्या निवेदनात म्हटले होते.

NATO VS China NATO declare china a global security challenge beijing accuses NATO of exaggerating china threat theory | जागतिक सुरक्षिततेसाठी चीन धोकादायक, NATO देशांनी व्यक्त केली चिंता; ड्रॅगननं दिलं असं उत्तर 

जागतिक सुरक्षिततेसाठी चीन धोकादायक, NATO देशांनी व्यक्त केली चिंता; ड्रॅगननं दिलं असं उत्तर 

googlenewsNext

पेइचिंग/ब्रुसेल्स - अमेरिकेच्या नेतृत्वाखालील लष्करी आघाडी असलेल्या नाटो आणि चीन यांच्यात पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. नुकत्याच ब्रुसेल्स येथे झालेल्या नाटो शिखर परिषदेतील नेत्यांनी म्हटले होते, की चीन जागतिक सुरक्षिततेसाठी धोनादायक बनला आहे. एवढेच नाही, तर चीन आंतरराष्ट्रीय नियमांवर आधारलेल्या व्यवस्थेला कमकूवत करण्याचे काम करत आहे, असेही नाटोने आपल्या निवेदनात म्हटले होते. यावर उत्तर देत, आम्ही शांततेसाठी काम करतो आणि स्व-संरक्षणासाठी पूर्णपणे तयार आहोत, असे चीनने म्हटले आहे. (NATO VS China NATO declare china a global security challenge beijing accuses NATO of exaggerating china threat theory)

चीनचं नाटोला उत्तर -
चीनच्या ब्रुसेल्स येथील मिशनने म्हटले आहे, की नाटोचे वक्तव्य हे चीनच्या शांतीपूर्ण विकासाला बदनाम करणारे आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय परिस्थितीचे आणि स्वत: नाटोच्या भूमिकेचे चुकीचे आकलन करणारे आहे. याच बोरबर, शीतयुद्धचा विचार तथा संघटनात्मक राजकीय मनोवृत्ती दर्शवणारेही आहे. नाटोतील सदस्य देशांच्या तुलनेत पेइचिंग आपल्या सैन्यावर अत्यंत कमी खर्च करते, असेही चीनने म्हटले आहे.

G7: आता लहान समूह जगावर राज्य करू शकत नाहीत; चीनने दिला इशारा
 
शांतता कायम रखण्याचा अधिकार सोडणार नाही -
चीनने नाटो देशांना इशारा देत म्हटले आहे, की चीन शांतता कायम ठेवण्याचा अधिकार कधीही सोडणार नाही. मात्र, आपले सार्वभौमत्व, सुरक्षितता आणि विकास हितांचे दृढतेने संरक्षण करेल. चीनचा हा इशारा, अमेरिके, इंग्लंडसह युरोपातील अशा देशांसाठीही असल्याचे मानले जात आहे, जे दक्षीण चीन सागरात लढाऊ युद्धनौका तैनात करण्याचा विचार करत आहेत.

नाटो नेत्यांनी सोमवारी एक निवेदन जारी करत म्हटले होते, की चीनच्या लक्ष्य आणि दबाव वाढविणाऱ्या व्यवहाराने नियमांवर आधारलेल्या जागतीक व्यवस्थेसमोर आव्हान उभे केले आहे. आणि संयुक्त संरक्षण असलेल्या भागांतही हा चिंतेचा विषय आहे. मात्र, 30 देशांचे सरकार आणि प्रमुखांनी चीनला प्रतिस्पर्धक म्हटले नाही. पण, चीनच्या दबाव टाकणाऱ्या धोरणावर त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. 

Love Story : 10वी नापास रिक्षावाला प्रेमात पोहोचला स्वित्झर्लंडला! फिल्मी आहे संपूर्ण स्टोरी

चीनकडून अनेक देशांना धोका!
तत्पूर्वी, जी-७ गटात सहभागी असलेले कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी चीनच्या मुद्द्यावरून चर्चेला सुरुवात केली. त्यांनी सर्व सहभागी देशांना आवाहन करत म्हटले आहे, की चीनपासून अनेक देशांना धोका आहे आणि हा धोका ओळखून संयुक्तरित्या पावले उचलायला हवीत. तसेच दुसरीकडे जी-७ देशांच्या बैठकीत चीनला रोखण्यासाठी काय उपाय करता येतील, याची रणनीती तयार केली जात असल्याचे सांगितले जात आहे. 
 

Web Title: NATO VS China NATO declare china a global security challenge beijing accuses NATO of exaggerating china threat theory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.