नवाज शरीफ आणि मरियम यांना लाहोर विमानतळावर अटक, पाकिस्तानात तणावाचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 09:42 PM2018-07-13T21:42:54+5:302018-07-13T23:08:00+5:30

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम नवाज यांना लाहोर विमानतळावर अटक करण्यात आली आहे. 

Nawaz Sharif and Maryam Nawaz has landed in Lahore | नवाज शरीफ आणि मरियम यांना लाहोर विमानतळावर अटक, पाकिस्तानात तणावाचे वातावरण

नवाज शरीफ आणि मरियम यांना लाहोर विमानतळावर अटक, पाकिस्तानात तणावाचे वातावरण

Next

लाहोर :  बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम नवाज यांना लाहोर विमानतळावर अटक करण्यात आली. पाकिस्तानातील एएनबीने अटकेची ही कारवाई केली.
नवाज शरीफ आणि मरियम यांना लाहोर विमानतळावर अटक केल्यानंतर त्यांना विशेष विमानाने इस्लामाबादला नेण्यात आले. दरम्यान, नवाज शरीफ यांच्या अटकेच्या पाश्वभूमीवर पाकिस्तानात मोठा तणाव निर्माण झाला असून लाहोरमध्ये काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. तसेच, नवाज शरीफ यांच्या पीएमएल-एन पक्षाचे कार्यकर्ते मोठया संख्येने विमानतळ परिसरात जमले आहेत. तर, काही ठिकाणी हिंसकवळण आले असून पोलिसांनी 378 जणांना ताब्यात घेतले आहे. याचबरोबर, लाहोर विमानतळाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. 



 




दरम्यान, नवाज शरीफ आणि मरियम सुरुवातीला लंडनहून अबुधाबीला पोहोचले. त्यानंतर अबुधाबीहून संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास इतिहाद एअरवेजचे विमानाने लाहोरला रवाना झाले. अबुधाबीहून नवाज शरीफ आणि मरियम नवाज यांच्यासोबत नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोचे अधिकारी सुद्धा विमानात होते.  तसेच, नवाज शरीफ आणि मरियम यांना लाहोर विमानतळावर आल्यानंतर अटक करण्यात येणार असल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले होते. 


या भ्रष्टाचार प्रकरणामध्ये नवाज शरीफ यांना न्यायालयाने 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तर, मरियम शरीफ हिला 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याबरोबर, नवाज शरीफ यांना 8 मिलियन पाऊंडचा दंड, तर मरियमला 2 मिलियन पाऊंडच्या दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. 



 

Web Title: Nawaz Sharif and Maryam Nawaz has landed in Lahore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.