नवाज शरीफ अडचणीत, सर्वोच्च न्यायालयाचे चौकशीचे आदेश

By admin | Published: November 1, 2016 04:25 PM2016-11-01T16:25:24+5:302016-11-01T16:25:24+5:30

पनामा पेपर्स लीक प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याविरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत

Nawaz Sharif's order, order of Supreme Court inquiry | नवाज शरीफ अडचणीत, सर्वोच्च न्यायालयाचे चौकशीचे आदेश

नवाज शरीफ अडचणीत, सर्वोच्च न्यायालयाचे चौकशीचे आदेश

Next
ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 1 - पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ अडचणीत सापडले आहेत. पनामा पेपर्स लीक प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नवाज शरीफ यांच्याविरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत. काही दिवसांपुर्वी सर्वोच्च न्यायालयाने नवाज शरीफ यांना नोटीस बजावली होती. सप्टेंबर महिन्यात फेडरल ब्युरो ऑफ रेव्हेन्यू (एफबीआर) ने जवळपास 450 जणांना नोटीस बजावली होती. नोटीस बजावण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये शरीफ यांच्या कुटुंबातील सदस्यांचाही समावेश होता.
 
दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिल्यानंतर इमरान खान यांनी आपण विजयी रॅली काढणार असल्याचं जाहीर केलं आहे. 
 
पनामा पेपर्स लीक प्रकरणात  शरीफ यांची दोन मुले आणि मुलीच्या कंपन्यांचा समावेश असून, ते शरीफ कुटुंबीयांचे परदेशातील व्यवहार सांभाळतात, असा उल्लेख होता. एप्रिलमध्ये उघड झालेल्या पनामा पेपर्स लीकमुळे जगभरात खळभळ उडाली होती. या कागदपत्रांनुसार पनामा येथील मोसाक फोन्सेका ही कंपनी जगभरातील धनाढ्यांच्या कंपन्यांचे व्यवहार सांभाळत असे.   
 

काय आहे पनामा प्रकरण?

जगभरातील नेते, उद्योजक, खेळाडू आणि अभिनेते आदींनी कथितरित्या कर वाचविण्यासाठी किंवा काळा पैसा पांढरा करण्यासाठी परदेशात केलेल्या गुंतवणूकीबाबतची लाखो कागदपत्रे फुटली आहेत. शोधपत्रकारांच्या आंतरराष्ट्रीय महासंघाने (आयसीआयजे)ही कागदपत्रे समोर आणण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. गेल्या ४० वर्षांतील माहिती यात आहे. जर्मनीतील एका वर्तमानपत्राने म्हटले आहे की, यातून २.६ टेराबाईट डेटा समोर आला आहे, जो की ६०० डीव्हीडीत समाविष्ट होऊ शकतो. जगभरातील किमान १४० बड्या नेत्यांनीही संपत्ती लपविल्याचे यातून समोर आले आहे.

Web Title: Nawaz Sharif's order, order of Supreme Court inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.