डोनाल्ड ट्रम्प उमेदवारीच्या जवळ
By admin | Published: May 5, 2016 03:00 AM2016-05-05T03:00:41+5:302016-05-05T03:00:41+5:30
अमेरिकन अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षातर्फे इच्छुक डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी आपले पक्षातील प्रतिस्पर्धी टेड क्रूझ यांना शर्यतीतून बाहेर टाकले. इंडियाना प्रायमरीत ट्रम्प
वॉशिंग्टन : अमेरिकन अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षातर्फे इच्छुक डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी आपले पक्षातील प्रतिस्पर्धी टेड क्रूझ यांना शर्यतीतून बाहेर टाकले. इंडियाना प्रायमरीत ट्रम्प यांनी क्रूझ यांना जोरदारपणे पराभूत केले. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या या निवडणुकीत ट्रम्प यांची गाठ डेमोक्रॅटिक पक्षातर्फे आघाडीवरील इच्छुक हिलरी क्लिंटन यांच्याशी होण्याची मोठी शक्यता आहे. क्लिंटन यांना मात्र इंडियानात त्यांचे स्पर्धक बर्नी सँडर्स यांनी पराभूत केले.
अनुमानावर का असेना मी रिपब्लिकन पक्षातर्फे उमेदवार आहे याचा मला अभिमान आहे. ही वेळ आमच्या पक्षात ऐक्य निर्माण करण्याची व हिलरी क्लिंटन यांना पराभूत करण्याची आहे, असे डोनाल्ड ट्रम्प इंडियाना प्रायमरीतील विजयानंतर आपल्या पाठीराख्यांना पाठविलेल्या संदेशात म्हणाले.
क्रूझ यांचे ट्रम्प यांच्याशी कडवट व ओंगळ असे शाब्दिक युद्ध झाले होते. या स्पर्धेतून माघार घ्यायचा निर्णय क्रूझ यांनी मतमोजणी पूर्ण झालेली नसतानाही जाहीर केला. आता ट्रम्प यांना पक्षातर्फे निवडणुकीत उमेदवारी मिळविण्यासाठी १,२३७ डेलिगेट्सची गरज असून आता त्यांना २०० पेक्षा कमी डेलिगेट्स मिळवायचे आहेत. अजूनही त्यांना ओहियोचे गव्हर्नर जॉन कॅसिच यांचे आव्हान आहे. कॅसिच यांच्याकडे २०० पेक्षा कमी डेलिगेट्स आहेत. मी शर्यतीतून माघार घेणार नाही, असे कॅसिच यांनी जाहीर केले.