सोशल मीडियावर लक्ष ठेवण्याची गरज
By admin | Published: May 13, 2016 04:17 AM2016-05-13T04:17:09+5:302016-05-13T04:17:09+5:30
अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत आवश्यक सुरक्षेसह सोशल मीडियावर लक्ष ठेवण्याची गरज आहे, असे मत संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी व्यक्त केले.
संयुक्त राष्ट्र : अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत आवश्यक सुरक्षेसह सोशल मीडियावर लक्ष ठेवण्याची गरज आहे, असे मत संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी व्यक्त केले. अतिरेकी संघटना आपल्या कटकारस्थानांसाठी सोशल मीडियाचा उपयोग करत आहेत. तसेच या माध्यमातून तरुणांनाही आकर्षित केले जात आहे, असेही ते म्हणाले.
दहशतवादाविरुद्धच्या चर्चेत बोलताना अकबरुद्दीन म्हणाले की, विकसित आणि विकसनशील देशात सोशल मीडियाचे नेटवर्क वाढत आहे. तर या माध्यमातून दहशतवादाच्या राक्षसाचा प्रसार होत आहे. इसिसमध्ये विदेशी नागरिक सहभागी होत आहेत. यात १५ ते २५ वर्षांच्या युवकांचे प्रमाण अधिक आहे. विविधता असलेल्या जाती समूहातून हे तरुण सहभागी होत आहेत.
अफगाणिस्तानचे स्थायी प्रतिनिधी नजीफुल्ला सालारजई यांनी पाकचा उल्लेख करून तालिबानचे उदाहरण दिले. ते म्हणाले की, अल - कायदा, अल-शबाब, बोको हरम आणि इसिसच्यापूर्वी तालिबान आले होते. तर त्यांचे समर्थन करणाऱ्यांनी मुलींचे शाळेत जाणे बंद करणे, आत्मघाती हल्ले करणे यांसारखी अतिरेकी कामे केली.