पायाभूत सोयी बळकट करण्याची गरज

By Admin | Published: February 9, 2016 02:00 AM2016-02-09T02:00:15+5:302016-02-09T02:00:15+5:30

भारताला पायाभूत सुविधांना बळकट करून मेक इन इंडियासारख्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमावर लक्ष द्यायची गरज आहे, असे आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर

The need to strengthen infrastructure | पायाभूत सोयी बळकट करण्याची गरज

पायाभूत सोयी बळकट करण्याची गरज

googlenewsNext

वॉशिंग्टन : भारताला पायाभूत सुविधांना बळकट करून मेक इन इंडियासारख्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमावर लक्ष द्यायची गरज आहे, असे आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर यांनी म्हटले. या दोन्ही मोहिमांना राबविणे ही भारतासाठी मोठी परीक्षाच असेल, असेही त्या म्हणाल्या. कोचर हार्वर्ड विद्यापीठातील ‘भारत संमेलन २०१६’ मध्ये त्या मुख्य वक्ता म्हणून बोलत होत्या.
चंदा कोचर म्हणाल्या की, ‘‘प्रामाणिकपणे प्रयत्न होत आहेत आणि बदल व्हावेत ही सरकारचीही इच्छा आहे. ई-गव्हर्नन्सवर खूप जोर दिला जात आहे. दहा किंवा नऊ
टक्के विकासदर गाठण्यासाठी आम्हाला आमची इच्छा आणि कार्यक्रम यांना प्रत्यक्ष राबविण्यासाठी प्रत्यक्षात खूप काही करायचे
आहे.’’
सरकारने निश्चित केलेला विकास आणि विकास दराच्या मार्गावर आम्हाला लक्ष केंद्रित केले पाहिजे. आम्हाला आम्हीच बनविलेल्या आमच्या योजनांची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. भारतासाठी ही मोठी परीक्षा असेल, असेही चंदा कोचर म्हणाल्या. त्यांनी पायाभूत सुविधा बळकट करण्यावर भर दिला.
पायाभूत सुविधांमध्ये आम्ही खूप कमी गुंतवणूक केली आहे. गुंतवणूक न वाढल्यास आम्ही आमच्याच विकासात अडचणी निर्माण करणार आहोत, असा इशारा कोचर यांनी दिला. भारतीय अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करीत आहेत. ‘मेक इन इंडिया’ तसेच गुंतवणुकीसाठी हाती घेतलेले इतर विविध उपक्रम हा या उपाययोजनांचाच भाग आहेत. याचा योग्य परिणाम दिसून येत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
चालू आर्थिक वर्षात खाण आणि उत्खनन, वीज व वीज पुरवठा व इतर सेवांच्या विकास दरात घट होण्याची अपेक्षा आहे. जीडीपीचे आकडे बरीच सकारात्मक दिशा दाखवित आहेत. गेल्या दीड वर्षात सरकारने धोरण आणि सुधारणांच्या दिशेने जी पावले टाकली त्याचे फळ आता दिसत आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: The need to strengthen infrastructure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.