Covishield: कोव्हिशिल्डच्या तिसऱ्या डोसची गरज आहे का? ऑक्सफर्डकडून नवे संशोधन सादर...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 08:41 AM2021-07-01T08:41:13+5:302021-07-01T08:42:23+5:30

Covishield booster dose: कोरोना लसीचे दोन डोस कोरोना व्हायरसविरोधात चांगले निकाल देतील. यामुळे कदाचित तिसऱ्या डोसची गरजही लागणार नाही, अशी अपेक्षा या संशोधकांना व्यक्त केली आहे.

need of third dose of covishield? boosts immune response, Oxford study finds | Covishield: कोव्हिशिल्डच्या तिसऱ्या डोसची गरज आहे का? ऑक्सफर्डकडून नवे संशोधन सादर...

Covishield: कोव्हिशिल्डच्या तिसऱ्या डोसची गरज आहे का? ऑक्सफर्डकडून नवे संशोधन सादर...

Next

लंडन : कोरोनाचे वेगवेगळे व्हेरिअंट समोर येत आहेत. ब्रिटनमध्ये डेल्टा प्लस व्हेरिअंटने धुमाकुळ घातलेला असताना भारतातही कोरोनाचा हा व्हेरिअंट सापडल्याने खळबळ उडाली होती. यामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून केंद्राने राज्यांना शिथिलता न देण्याबरोबरच सावधगिरी बाळगण्यास सांगितले होते. एकीकडे लसीकरणाने वेग घेतलेला असताना सर्वाधिक पसंतीची कोव्हिशिल्ड (covishield) बनविणाऱी कंपनी एस्ट्राजेनेका (AstraZeneca) आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने (Oxford) तिसऱ्या डोसची गरज आहे की नाही यावर संशोधन केले आहे. (Third dose of AstraZeneca COVID-19 vaccine boosts immune response, Oxford study finds)

यामध्ये असे आढळले आहे की, कोव्हिशिल्डचा तिसरा डोस घेतल्यास कोरोनापासून अधिक सुरक्षा मिळत आहे. ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटीच्या संशोधकांनुसार एस्ट्राजेनेकाच्या लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर ६ महिन्यांनी बुस्टर डोस घ्यावा लागणार आहे. यामुळे शरिरातील अँटीबॉडीचा स्तर वाढणार आहे. 

कोरोना लसीचे दोन डोस कोरोना व्हायरसविरोधात चांगले निकाल देतील. यामुळे कदाचित तिसऱ्या डोसची गरजही लागणार नाही, अशी अपेक्षा या संशोधकांना व्यक्त केली आहे. या अभ्यासानुसार एस्ट्राजेनेका व फायजर कंपनीच्या लसींचे दोन्ही डोस घेतल्यास डेल्टा व्हेरिअंटमुळे हॉस्पिटलमध्ये भरती होण्य़ाची शक्यता जवळपास ९६ टक्क्यांनी कमी होऊ शकते. 

आणखी एका संशोधनात एस्ट्राजेनेकाच्या लसीचा एक डोस घेतल्यानंतर शरीरात कमीतकमी एक वर्षापर्यंत अँटीबॉडी टिकतात असे दिसून आले आहे. दुसऱ्या डोसनंतर सुरक्षा आणखी वाढते. तिसऱ्या डोससाठीच्या नवीन संशोधनात ९० लोकांनी भाग घेतला होता. त्याचे वय ४० वर्षे होते. या सर्वांना तिसरा डोस देण्य़ात आला होता. अँटीबॉडीचा स्तर तपासण्यासाठी त्यांची रक्त चाचणी करण्यात आली होती. 

Web Title: need of third dose of covishield? boosts immune response, Oxford study finds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.