पावसाचं तांडव; नेपाळमध्ये 1500 भारतीय यात्रेकरू अडकले, दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2018 04:33 PM2018-07-03T16:33:53+5:302018-07-03T19:07:08+5:30

कैलास मानसरोवर यात्रेवर निघालेले 1500हून अधिक भारतीय नागरिक मुसळधार पावसामुळे नेपाळमध्ये अडकले आहेत.

nepal 104 indian pilgrims of kailash mansarovar yatra evacuated to simikot from hilsa | पावसाचं तांडव; नेपाळमध्ये 1500 भारतीय यात्रेकरू अडकले, दोघांचा मृत्यू

पावसाचं तांडव; नेपाळमध्ये 1500 भारतीय यात्रेकरू अडकले, दोघांचा मृत्यू

googlenewsNext

नवी दिल्ली/ काठमांडू : कैलास मानसरोवर यात्रेवर निघालेले 1500हून अधिक भारतीय नागरिक मुसळधार पावसामुळे नेपाळमध्ये अडकले आहेत. नेपाळमधील भारतीय दूतावासाने जाहीर केलेल्या यात्रेकरूंच्या यादीनुसार, भारतातून गेलेले 525 यात्रेकरू सिमीकोट इथे, 550 हिल्सा इथे तर तिबेटच्या मार्गावर 500 यात्रेकरू अडकले आहेत.



कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या 104 यात्रेकरूंना आतापर्यंत वाचवण्यात यश आलं आहे. मात्र आंध्र प्रदेश आणि केरळच्या दोन यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. यामधील आंध्र प्रदेशच्या यात्रेकरूचा मृतदेह हाती लागला असून शवविच्छेदनानंतर त्यांचं पार्थिव त्यांच्या गावी रवाना करण्यात येईल. 




 

नेपालगंज, सिमीकोट आणि हिल्सा या भागातील परिस्थितीवर भारतीय दूतावास लक्ष ठेवून आहे. मंगळवारी सकाळी वातावरण खराब झाले होते.  नेपाळमध्ये भारतीय दूतावासाने यात्रेकरू व त्यांच्या नातेवाईकांसाठी विविध भाषांमधून हॉटलाईन सेवा सुरू केली आहे. तसेच नेपाळमध्ये नागरिक व वैद्यकीय सेवा पुरेशा नसल्याने यात्रेकरूंना तिबेटमध्येच थांबण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. 



परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज संपूर्ण परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. भारतीय दूतावासाने  नेपालगंज आणि सिमीकोटमध्ये आपले प्रतिनिधी तैनात केले आहेत. बचाव पथकाला सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच यात्रेकरूंच्या भोजन आणि राहण्याची व्यवस्था प्रशासनानं केली आहे.





 

 

Web Title: nepal 104 indian pilgrims of kailash mansarovar yatra evacuated to simikot from hilsa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.