नेपाळ भूकंपात १५७ ठार, १६० जण जखमी, शेकडो घरांचे नुकसान; भारतातही जाणवले धक्के
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2023 06:09 AM2023-11-05T06:09:19+5:302023-11-05T06:09:46+5:30
नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल यांनी भूकंपग्रस्त परिसराची पाहणी केली.
काठमांडू/नवी दिल्ली : नेपाळमध्ये शुक्रवारी रात्री ११ वाजून ३२ मिनिटांनी रिश्टर स्केलवर ६.४ इतक्या तीव्रतेचा भूकंप झाला. शेकडो घरांचे यात मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेत मृतांची संख्या १५७ वर पोहोचली तर १६० जण जखमी झाले आहेत.
या भूकंपाचे केंद्र राजधानी काठमांडूच्या उत्तर पश्चिमेला ३३१ किलोमीटरवर आणि १० किलोमीटर जमिनीखाली आढळले. जाजरकोट आणि रुकुम या जिल्ह्यांमध्ये भूकंपामुळे मोठे नुकसान झाले आहे. येथे आतापर्यंत १०५ आणि ३६ जण मृत्युमुखी पडले आहेत.
नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल यांनी भूकंपग्रस्त परिसराची पाहणी केली. भारतात दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, हरयाणा, पंजाब आणि पाटणा आदी ठिकाणी या भूकंपाचे हादरे जाणवले.
पंतप्रधान मोदींची सहवेदना
पंतप्रधान पुष्पकलम दहल यांनी देशाच्या तिन्ही संरक्षण यंत्रणांना बचावकार्य सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भूकंपात मरण पावलेल्या व्यक्तींबाबत दु:ख व्यक्त करीत संकटाच्या स्थितीत नेपाळला मदत करण्याचे स्पष्ट केले आहे.