तब्बल 126 तास केले नृत्य...नेपाळच्या तरुणीचा विश्वविक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2019 08:49 PM2019-05-04T20:49:24+5:302019-05-04T20:50:04+5:30
तसे नृत्य करणे हे थकविणारेच. फारतर तास-दीड तास नाच करू शकतो.
काठमांडू : आजच्या जगात काय अशक्य आहे? तंत्रज्ञानामुळे सारे काही शक्य झाले आहे. शेजारच्या नेपाळमधील एका तरुणीने जगाला आश्चर्याने बोटे तोंडात घालायची वेळ आणली आहे. या तरुणीने तब्बल 126 तास न थकता न थांबता नृत्य करत वर्ल्ड रेकॉर्ड केले आहे. याचबरोबर हा विक्रम करणारी ही जगातील पहिली तरुणी बनली आहे. याआधी हे रेकॉर्ड एका भारतीयाच्या नावे होते.
तसे नृत्य करणे हे थकविणारेच. फारतर तास-दीड तास नाच करू शकतो. मात्र, नेपाळच्या तरुणीने 126 तास नृत्य केले आहे. वंदना नेपाल असे या तरुणीचे नाव असून नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी शनिवारी वंदनाचा सत्कार केला. वंदनाचे वय अवघे 18 वर्षे आहे.
वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना वंदनाने सांगितले की शुक्रवारी गिनिज बुककडून याबाबत सांगण्यात आले. वंदना ही नेपाळच्या धनकुटा जिल्ह्यातील राहणारी आहे. वंदनाने भाकताच्या कलामंडलम हेमलता यांनी स्थापित केलेले रेकॉर्ड तोडले आहे. हेमलता यांनी 2011 मध्ये 123 तास आणि 15 मिनिटे सलग नृत्य करत वर्ल्ड रेकॉर्ड केले होते.