नेपाळ भूस्खलन, पुरातील बळींची संख्या ११५ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 04:06 AM2017-08-16T04:06:58+5:302017-08-16T04:07:01+5:30

नेपाळच्या अनेक जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आलेला पूर व भूस्खलन यात बळी पडलेल्यांची संख्या ११५ वर गेली आहे.

Nepal landslide, number of victims in 115 | नेपाळ भूस्खलन, पुरातील बळींची संख्या ११५ वर

नेपाळ भूस्खलन, पुरातील बळींची संख्या ११५ वर

Next

काठमांडू : नेपाळच्या अनेक जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आलेला पूर व भूस्खलन यात बळी पडलेल्यांची संख्या ११५ वर गेली आहे. तर सुमारे ४० लोक गायब आहेत. या पुरामुळे हजारो लोक बेघर झाले आहेत.
गेले ३ दिवस नेपाळला मुसळधार पावसाचा तडाखा बसला असून, त्यामुळे पुराच्या व दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. पुरामुळे विस्थापित झालेल्या हजारो लोकांना तात्पुरता आश्रय मिळाला आहे. मात्र त्यांना अद्याप कोणतीही मदत मिळालेली नसल्याचे ‘काठमांडू पोस्ट’ने म्हटले आहे. निर्मनुष्य भागातून सात मृतदेह सापडले आहेत. आतापर्यंत पुरामुळे ११५ जणांचा बळी गेला असल्याचे गृहमंत्रालयाने सांगितले. ‘पुरामुळे किती नुकसान झाले, हे निश्चित करण्यासाठी गृहमंत्री जनार्दन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे,’ असे गृहमंत्रालयाचे प्रवक्ते राम कृष्ण सुबेदी यांनी सांगितले.
नेपाळ सरकारने बचाव व मदत कार्याचा वेग वाढवला असून, आपत्तीनंतर मदतीसाठी २७ हजार सुरक्षा रक्षकांना नेमण्यात आले आहे. हरवलेल्यांना शोधण्याचे कार्यही सुरू असल्याचे गृहमंत्रालयाने सांगितले.
१३ हेलिकॉप्टर (त्यात नेपाळ आर्मीच्या हेलिकॉप्टरचाही समावेश आहे) मोटारबोट, रबरबोट इत्यादींद्वारे नागरिकांना मदत पुरविण्यात येत आहे. नेपाळमधील बहुतांश भागातून वाहणाºया राप्ती नदीला मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. त्यामुळे नेपाळचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पुरात अनेक विदेशी लोक अडकले आहेत. त्यात ३५ भारतीयांचा समावेश असल्याचे भारतीय दूतावासाकडून मंगळवारी स्पष्ट करण्यात आले. या पुरामुळे नेपाळमधील २७ जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे.

Web Title: Nepal landslide, number of victims in 115

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.