नेपाळ : २२ जणांना घेऊन जाणारं विमान बेपत्ता, ४ भारतीय आणि ३ जपानी नागरिकांचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 12:24 PM2022-05-29T12:24:34+5:302022-05-29T12:25:00+5:30

तारा एअर 9 NAET ट्विन-इंजिन असलेल्या विमानाचा संपर्क अचानक तुटला.

Nepal plane with 22 on board including 4 Indians 3 japan passengers goes missing | नेपाळ : २२ जणांना घेऊन जाणारं विमान बेपत्ता, ४ भारतीय आणि ३ जपानी नागरिकांचाही समावेश

नेपाळ : २२ जणांना घेऊन जाणारं विमान बेपत्ता, ४ भारतीय आणि ३ जपानी नागरिकांचाही समावेश

Next

नेपाळमध्ये २२ जणांना नेणाऱ्या तारा एअर 9 NAET ट्वीन इंजिन असलेल्या एका विमानाचा संपर्क अचानक तुटला. यामध्ये १९ प्रवासी होते. तसंच या प्रशांसोबत यात ३ क्रू मेंबर्सदेखील होते. या विमानातनेपाळी नागरिकांसह ४ भारतीय आणि ३ जपानी नागरिकदेखील प्रवास करत होते. पोखरा येथून जोमसोमसाठी या विमानानं सकाळी ९.५५ वाजता उड्डाण केलं होतं अशी माहिती विमानतळावरील एका अधिकाऱ्यानं दिली.

गृह मंत्रालयाचे प्रवक्ते फदींद्र मणी पोखरेल म्हणाले की, बेपत्ता विमानाचा शोध घेण्यासाठी मंत्रालयाने मुस्तांग आणि पोखरा येथून दोन खाजगी हेलिकॉप्टर तैनात केले आहेत. शोधासाठी नेपाळ लष्कराचे हेलिकॉप्टर तैनात करण्याची तयारीही सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.

"विमान मुस्तांग जिल्ह्यातील जोमसोमच्या आकाशात दिसले आणि नंतर धौलागिरी पर्वताच्या दिशेने वळले, त्यानंतर त्याचा संपर्क झाला नाही,” अशी माहिती मुख्य जिल्हाधिकारी नेत्रा प्रसाद शर्मा यांनी दिली. तर दुसरीकडे कॅप्टन प्रभाकर प्रसाद घिमिरे, सहवैमानिक उत्सव पोखरेल आणि एअर होस्टेस किस्मी थापा हे विमानात होते, असं तारा एअरचे प्रवक्ते सुदर्शन बर्तौला यांच्याकडून सांगण्यात आलं.

Web Title: Nepal plane with 22 on board including 4 Indians 3 japan passengers goes missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.