“योगाचे मूळ नेपाळमध्ये, तेव्हा भारत अस्तित्वातच नव्हता”: केपी शर्मा ओली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 11:20 PM2021-06-21T23:20:43+5:302021-06-21T23:30:06+5:30

योगाचे मूळ नेपाळमध्ये आहे. तेव्हा भारत अस्तित्वात नव्हता, असे केपी शर्मा ओली यांनी म्हटले आहे.

nepal pm kp sharma oli claims that yoga originated in Nepal not in India | “योगाचे मूळ नेपाळमध्ये, तेव्हा भारत अस्तित्वातच नव्हता”: केपी शर्मा ओली

“योगाचे मूळ नेपाळमध्ये, तेव्हा भारत अस्तित्वातच नव्हता”: केपी शर्मा ओली

googlenewsNext
ठळक मुद्देनेपाळच्या पंतप्रधानांचा अजब दावायोगाचे मूळ नेपाळमध्ये, भारत तेव्हा अस्तित्वात नव्हताआमची बाजू योग्य पद्धतीने मांडू शकलो नाही - केपी शर्मा ओली

काठमांडू: जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी लोकांनी उत्स्फूर्तपणे कोरोनाच्या नियमांचे पालन करून योगासने करण्यात आली. या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशी नेपाळचे काळजीवाहू पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी एक हास्यापद दावा केला आहे. योगाचे मूळ नेपाळमध्ये आहे. तेव्हा भारत अस्तित्वात नव्हता, असे केपी शर्मा यांनी म्हटले आहे. (nepal pm kp sharma oli claims that yoga originated in Nepal not in India)

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या निवासस्थानी आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. योगाची निर्मिती नेपाळमध्ये झाली आहे. योगाला सुरुवात झाली, तेव्हा भारत अस्तित्वात नव्हता. अनेक तुकड्यांमध्ये तो विभागला गेला होता. तज्ज्ञमंडळी तथ्य आणि सत्य लपवत आहेत, असा दावाही त्यांनी केला. 

“आधी काँग्रेसला स्वतःचं नाव बदलावं लागेल”: ज्योतिरादित्य शिंदे

भारताच्या निर्मितीच्या आधीपासून नेपाळमध्ये योग

भारताची निर्मितीही झाली नव्हती, त्याआधीपासूनच नेपाळमध्ये योगाभ्यास केला जात होता. उत्तराखंड आणि नेपाळ आणि उत्तराखंडच्या भागात योगाची उत्पत्ती झाली होती, असेही केपी शर्मा ओली यांनी म्हटले आहे. केपी शर्मा ओली यांच्या वक्तव्यानंतर आता नेपाळ सरकारचे अपयश लवण्यासाठी भारतावर आरोप करण्यात येत असल्याची टीका केपी शर्मा ओली यांच्यावर करण्यात येत आहे. 

कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी अमरनाथ यात्रा रद्द; तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर निर्णय

पंतप्रधान मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर योगा नेला

आमच्याकडील ऋषीमुनींनी योगाचा शोध लावला होता. मात्र, त्यांना आम्ही कधी श्रेय दिले नाही. आमच्याकडील तथ्ये योग्य पद्धतीने आम्ही मांडू शकलो नाही. यातच भारताचे पंतप्रधान मोदींनी वर्षभरातील सर्वांत मोठ्या दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिवसाला मान्यता देण्याचा प्रस्ताव ठेवला आणि त्याला मान्यता मिळवून घेतली, असेही ते म्हणाले.  

भाजपला मोठा धक्का! विदर्भातील विद्यमान १० नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

दरम्यान, यापूर्वीही अयोध्येवरून केपी शर्मा ओली यांनी मोठे दावा केला होता. भारतातील अयोध्या बनावट असून, खरी अयोध्या नेपाळमध्ये असल्याचे ते म्हणाले होते. जनक कन्या सीता भारतातील नाही, तर नेपाळमध्ये असलेल्या अयोध्येच्या राजकुमाराला दिली होती, असेही ओली म्हणाले होते. 
 

Web Title: nepal pm kp sharma oli claims that yoga originated in Nepal not in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.