चीनने भूभाग बळकावल्याने नेपाळमध्ये संतापाची लाट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 04:13 AM2019-11-13T04:13:51+5:302019-11-13T04:13:59+5:30

भारत, भूतानमध्ये सतत घुसखोरी करू पाहणाऱ्या चीनने आता नेपाळमधील भूभाग बळकावल्याचे उघड झाले आहे.

Nepal waves tide over Nepal | चीनने भूभाग बळकावल्याने नेपाळमध्ये संतापाची लाट

चीनने भूभाग बळकावल्याने नेपाळमध्ये संतापाची लाट

Next

काठमांडू : भारत, भूतानमध्ये सतत घुसखोरी करू पाहणाऱ्या चीनने आता नेपाळमधील भूभाग बळकावल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे नेपाळच्या काही भागांतील लोकांनी सोमवारी जोरदार निदर्शने करून चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा पुतळाही जाळला.
या निदर्शकांच्या हातात आमची जमीन परत द्या आणि चीन सरकार, नेपाळमधून निघून जा, अशा मजकुराचे फलक होते. आतापर्यंत चीनने नेपाळमधील ३६ हेक्टर जमीन बळकावल्याचे उघड झाले आहे. नेपाळ सरकारच्या अहवालातूनच ही माहिती समोर आल्याने नेपाळमध्ये संतापाची लाट उमटली आणि लोक रस्त्यांवर उतरले. त्यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे. नेपाळ सरकारच्या माहितीनुसार हुमला जिल्ह्याच्या भागदरी नदीजवळची सहा हेक्टर, कर्नाली जिल्ह्यातील चार हेक्टर आणि सिंधुपालक जिल्ह्यातील १0 हेक्टरहून अधिक जमीन बळकावली आहे. नेपाळच्या भूसर्वेक्षण अहवालात या भूभागांवर चीनने अतिक्रमण केल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. मात्र, नेपाळ सरकारने त्यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. (वृत्तसंस्था)

Web Title: Nepal waves tide over Nepal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.