भूकंपाच्या धक्क्यांनी नेपाळ पुन्हा हादरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2017 03:14 PM2017-02-27T15:14:13+5:302017-02-27T15:15:18+5:30

सोमवारी सकाळी नेपाळला भूकंपाचे दोन धक्के बसले. 2015 मध्ये प्रलयकारी भूकंपाचा सामना केलेल्या नेपाळच्या नागरिकांमध्ये भूकंपानंतर घबराट

Nepal's earthquake shook Nepal again | भूकंपाच्या धक्क्यांनी नेपाळ पुन्हा हादरला

भूकंपाच्या धक्क्यांनी नेपाळ पुन्हा हादरला

Next
>ऑनलाइन लोकमत
काठमांडू, दि. 27 - सोमवारी सकाळी नेपाळला भूकंपाचे दोन धक्के बसले. 2015 मध्ये प्रलयकारी भूकंपाचा सामना केलेल्या नेपाळच्या  नागरिकांमध्ये भूकंपानंतर घबराट पसरली आणि ते घर सोडून रस्त्यावर पळाले. प्राथमिक वृत्तानुसार भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त अद्याप नाही. 
 
नॅशनल सिस्मोलॉजिकल सेंटरनुसार, स्थानिक वेळेनुसार सकाळी 9 वाजून 22 मिनिटांनी रिश्टर स्केलवर 4.6 तीव्रतेचा पहिला भूकंप आला त्यानंतर सकाळी 10 वाजून रिश्टर स्केलवर 6 मिनिटांनी 4.7 तीव्रतेचा भूकंप आला.     
 
दुस-यांदा आलेल्या भूकंपाचं केंद्र पश्चिम नेपाळच्या स्वनरा येथे होतं तर पहिल्या भूकंपाचं केंद्र सालू जवळ होतं. काठमांडूच्या घाटात भूकंपाच्या धक्क्यांचा परिणाम पाहायला मिळाला.  2015 मध्ये नेपाळमध्ये 7.8 रिस्टर स्केलच्या तीव्रतेचा जबरजस्त भूकंप आला होता. यामध्ये जवळपास 8000 जणांचा मृत्यू झाला होता.      
 

Web Title: Nepal's earthquake shook Nepal again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.