नेपाळचे माजी पंतप्रधान सुशील कोईराला यांचं निधन
By Admin | Published: February 9, 2016 04:40 AM2016-02-09T04:40:22+5:302016-02-09T09:17:49+5:30
नेपाळचे माजी पंतप्रधान सुशील कोईराला यांचे मंगळवारी निधन झाले.
ऑनलाइन लोकमत
काठमांडू, दि. ९ - नेपाऴचे माजी पंतप्रधान सुशील कोईराला यांचे मंगळवारी निधन झाले. ते ७६ वर्षाचे होते. उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सुशील कोईराला ११ फेब्रुवारी २०१४ ते १० ऑक्टोबर २०१५ या काळात नेपाळच्या पंतप्रधानपदी विराजमान होते. तसेच, ते २०१० पासून नेपाळी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्षही होते. त्यांचा जन्म १२ ऑगस्ट १९३९ मध्ये नेपाळच्या मोरांग जिल्ह्यात झाला होता. १९५० च्या दरम्यान त्यांनी राजकरणात पदार्पण केले होते. त्यानंतर १९५५ सालापासून नेपाळी काँगेसमध्ये सक्रिय होते.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोईराला यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. भारताने एक सच्च मित्र गमावल्याची प्रतिक्रिया देत त्यांनी ट्विटरवरून कोईराला यांना आदरांजली वाहिली आहे.
In Sushil Koirala ji, NC has lost a big leader who served Nepal for decades & India lost a valued friend. Pained by his demise. RIP.
— Narendra Modi (@narendramodi) February 9, 2016
Sushil Koirala ji's simplicity holds lessons for all of us. My condolences to the Koirala family & people of Nepal in this hour of grief.
— Narendra Modi (@narendramodi) February 9, 2016