नेपाळचे पंतप्रधान प्रचंड यांचा राजीनामा
By Admin | Published: May 24, 2017 07:07 PM2017-05-24T19:07:35+5:302017-05-24T19:07:35+5:30
नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल "प्रचंड" यांनी पंतप्रधानपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला
>ऑनलाइन लोकमत
काठमांडू, दि. 24 - नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल "प्रचंड" यांनी पंतप्रधानपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. नेपाळमध्ये आज घडलेल्या राजकीय घडामोडींमध्ये प्रसारमाध्यमातून देशाला संबोधून भाषण केल्यानंतर प्रचंड यांनी आपल्या पदाचा राजीनामा विद्यादेवी भंडारी यांच्याकडे राजीनामा सोपवला.
प्रचंड हे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात नेपाळच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले होते. त्यांना नेपाळी काँग्रेसने सशर्त पाठिंबा दिला होता. या पाठिंब्यासाठी झालेल्या करारानुसार प्रचंड यांनी ठराविक काळानंतर पद सोडणे अपेक्षित होते. मात्र मंगळवारी प्रचंड यांनी राजीनामा देणे टाळल्याने नेपाळमध्ये राजकीय अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर नेपाळी काँग्रेससोबत झालेल्य कराराचे पालन करत प्रचंड यांनी आपल्या पदाचा राजीनामा सोपवला.
प्रचंड यांनी राजीनामा दिल्याने नेपाळी काँग्रेसचे नेते शेरबहादूर देऊबा यांचा पंतप्रधान बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 62 वर्षीय प्रचंड यांची पंतप्रधान म्हणून ही दुसरी टर्म होती.