भूकंपामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा १० हजारापर्यंत जाण्याची शक्यता - नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला
By admin | Published: April 28, 2015 08:07 PM2015-04-28T20:07:26+5:302015-04-28T20:07:26+5:30
नेपाळमध्ये झालेल्या भूकंपात १० हजार लोक दगावले असण्याची शक्यता आज नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला यांनी वर्तवली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
काठमांडू, दि. २८ - नेपाळमध्ये झालेल्या भूकंपात १० हजार लोक दगावले असण्याची शक्यता आज नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला यांनी वर्तवली आहे.
या भूकंपात नेपाळमधील २९ जिल्हे बाधित असून मानवहानीचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. भूकंपग्रस्त नेपाळमध्ये सर्व शाळा-कॉलेजेस एक आठवडा बंद राहणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. काठमांडू येथे मुसळधार पावसाला सुरवात झाल्याने येथील मदतकार्यात अडथळे येत असले तरी संथ गतीने मदत कार्य सुरू आहे. नेपाळचे भारतातील राजदूत दीप उपाध्याय यांनी मदतकार्याबद्दल भारतीय हवाईदलाचे आभार मानले आहेत. मंगळवारी सकाळी नेपाळमधील मदत व बचावकार्याचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी सकाळी बैठक घेतली होती. त्याचप्रमाणे भारतभेटीवर आलेले अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी बचावकार्याबद्दल भारतीय लष्कराचे कौतूक केले.