नेताजींचा सोन्याचा दात टोकियोत?

By admin | Published: February 1, 2016 02:11 AM2016-02-01T02:11:49+5:302016-02-01T02:11:49+5:30

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा सोन्याचा दात अंत्यसंस्कारानंतर गोळा केलेल्या राखेत असू शकतो असा दावा आता ब्रिटनच्या एका वेबसाईटने केला आहे.

Netaji's gold tooth in Tokyo? | नेताजींचा सोन्याचा दात टोकियोत?

नेताजींचा सोन्याचा दात टोकियोत?

Next

लंडन : नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा सोन्याचा दात अंत्यसंस्कारानंतर गोळा केलेल्या राखेत असू शकतो असा दावा आता ब्रिटनच्या एका वेबसाईटने केला आहे. टोकियोतील रेनकोजी मंदिरातील त्यांच्या अंतिम अवशेषात हा दात असेल असा दावा करण्यात आला आहे.
१८ आॅगस्ट १९४५ रोजी तैवानमध्ये विमान अपघातात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू झाला होता. त्यांचे सहकारी कर्नल हबीबूर रहेमान यांनी त्यांच्या मुलाला हे सांगितले होते की, नेताजींच्या अस्थी एकत्र केल्या तेव्हा त्यात नेताजींचा सोन्याचा दातही होता. दरम्यान, १९७८ मध्ये कर्नल रेहमान यांचा मृत्यू झाला. (वृत्तसंस्था)

Web Title: Netaji's gold tooth in Tokyo?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.