Variant IHU Found in France: सॅम्पलमध्ये ओमायक्रॉन शोधत होते, कोरोनाचा लसविरोधी नवा व्हेरिअंट सापडला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 11:16 AM2022-01-04T11:16:33+5:302022-01-04T11:20:12+5:30

corona virus Variant IHU Found: जगभरात गेल्या महिन्यात ओमायक्रॉनमुळे (Omicron) दहशत पसरली होती. परंतू हा व्हेरिअंट फक्त वेगाने पसरतो, जास्त गंभीर करत नाही, हे समजल्यामुळे थोडा दिलासा मिळालेला असताना आता नव्या व्हेरिअंटने पुन्हा टेन्शन वाढविण्यास सुरुवात केली आहे.

new corona virus Variant IHU Found in France after Omicron; 12 patient found came from Africa | Variant IHU Found in France: सॅम्पलमध्ये ओमायक्रॉन शोधत होते, कोरोनाचा लसविरोधी नवा व्हेरिअंट सापडला

Variant IHU Found in France: सॅम्पलमध्ये ओमायक्रॉन शोधत होते, कोरोनाचा लसविरोधी नवा व्हेरिअंट सापडला

Next

जगात कोरोनाची चौथी आणि देशात तिसरी लाट येण्याची चिन्हे असताना कोरोनाचा आणखी एक नवा व्हेरिअंट सापडला आहे. या व्हेरिअंटने ४६ वेळा रुप बदलले आहे. फ्रान्समध्ये (Variant IHU) व्हेरिअंट सापडला आहे. हा आयएचयू व्हेरिअंट मूळ कोरोना व्हायरसच्या तुलनेत अधिक लसविरोधी आणि संक्रमक असू शकतो, अशी भीती शास्त्रज्ञांना वाटू लागली आहे. 

जगभरात गेल्या महिन्यात ओमायक्रॉनमुळे (Omicron) दहशत पसरली होती. परंतू हा व्हेरिअंट फक्त वेगाने पसरतो, जास्त गंभीर करत नाही, हे समजल्यामुळे थोडा दिलासा मिळालेला असताना आता नव्या व्हेरिअंटने पुन्हा टेन्शन वाढविण्यास सुरुवात केली आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार Variant IHU चा शोध फ्रान्समध्ये लागला आहे. फ्रान्सच्या मारसैल (Variant IHU in Marseille) मध्ये कोरोनाचा नवा व्हेरिअंट सापडला असून त्याचे १२ रुग्ण सापडले आहेत. महत्वाचे म्हणजे हे लोक आफ्रिकी देश कॅमेरूनहून परतले होते. 

सध्यातरी Variant IHU किती घातक आणि संक्रमक असेल याबाबत काही सांगता येणार नाही. कारण सध्या फ्रान्समध्ये ओमायक्रॉन व्हेरिअंटचा कहर सुरु आहे. दिवसाला सापडत असलेल्या एकूण रुग्णांपैकी ६० टक्के रुग्ण हे ओमायक्रॉनचे आहेत. या नव्या व्हेरिअंटला Méditerranée Infection Foundation ने १० डिसेंबरला शोधले होते. सध्यातरी Variant IHU वेगाने पसरत नाहीय. 

आयएचयू व्हेरिअंट अन्य देशांमध्ये पसरला आहे का, याचा शोध घ्यावा लागणार आहे. यासाठी जागतिक आरोग्य संघटना व्हेरिअंट अंडर इन्व्हेस्टिगेशनचा टॅग लावून तपास करेल. आयएचयूचा शोध लावणाऱ्या टीमचे प्रमुख प्राध्यापक फिलिप कोलसन यांनी सांगितले की, हा व्हेरिअंट E484K म्युटेशनपासून बनलाआहे, यामुळे हा व्हेरिअंट अधिक लस विरोधी ताकदीचा असू शकतो. याचा अर्थ यावर लसीचा परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. 

Web Title: new corona virus Variant IHU Found in France after Omicron; 12 patient found came from Africa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.