हृदयाच्या स्थितीची माहिती देणारे नवे उपकरण
By admin | Published: November 3, 2014 03:01 AM2014-11-03T03:01:41+5:302014-11-03T03:01:41+5:30
हृदयाची स्थिती सांगणाऱ्या तसेच शरीरावर धारण करता येणारे उपकरण एका परदेशस्थ भारतीय संशोधकाने विकसित केले आहे
बर्न : हृदयाची स्थिती सांगणाऱ्या तसेच शरीरावर धारण करता येणारे उपकरण एका परदेशस्थ भारतीय संशोधकाने विकसित केले आहे. वैद्यकीयदृष्ट्या, तसेच भावनिक दृष्ट्या हृदयाच्या बदलत्या स्थितीचा आढावा या उपकरणाद्वारे घेतला जातो, असा दावा या संशोधकाने केला आहे.
द इनर यू असे या उपकरणाचे नाव असून माणसाच्या शारिरीक व मानसिक आरोग्याची काळजी या उपकरणाने घेतली जाते असा दावा स्वीत्झर्लंडमध्ये स्थायिक झालेले भारतीय संशोधक श्रीनिवासन मुरली यांनी केला आहे.
द इनर यू या उपकरणाचे मुरली हे सहसंशोधक असून, हे उपकरण भारतात अत्यंत उपयोगी आहे असे मुरली यांचे म्हणणे आहे, कारण इसीजी,श्वासोच्छवास यांचा आढावा हे उपकरण घेते त्याआधारे हृदयरुग्णाची सर्व माहिती वेळेवर डॉक्टरला मिळू शकते. हे उपकरण वापरणाऱ्या व्यक्तीला त्याच्या मोबाईल फोनवर संदेश दिसतात.
आरोग्याची काळजीआरोग्याचीे संपूर्ण काळजी घेणारे हे उपकरण सर्वांना परवडणारे राहील, अशा पद्धतीने त्याची किंमत माफक ठेवण्याचा त्यांचा विचार आहे. हे उपकरण शारीरिक सिग्नल इसीजी, त्वचा व श्वासोच्छवास यावरुन घेते , एका टचवर हे ज्ञान त्याला मिळते व शारीरिक स्थितीचे तसेच मानसिक आंदोलनांचे चित्रण केले जाते. (वृत्तसंस्था)