पाक लष्कराची नवी डिव्हिजन
By Admin | Published: February 8, 2016 03:19 AM2016-02-08T03:19:53+5:302016-02-08T03:19:53+5:30
देशातील शैक्षणिक संस्थांवरील वाढत्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान लष्कराची नवीन सुरक्षा तुकडी (डिव्हिजन) निर्माण करणार आहे.
इस्लामाबाद : देशातील शैक्षणिक संस्थांवरील वाढत्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान लष्कराची नवीन सुरक्षा तुकडी (डिव्हिजन) निर्माण करणार आहे. याशिवाय २८ बटालियन्ससाठी (एक हजार सैनिकांची एक बटालियन) अतिरिक्त निधीची मागणी लष्कराने सरकारकडे केली आहे.
लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शनिवारी अर्थमंत्री इशाक दार यांची भेट घेऊन वरील मागणी केली, असे वृत्त ‘डॉन’ने अर्थमंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाचा आधार घेऊन दिले. सुरक्षेला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असून, त्यासाठी निधी देण्याचीही त्याची तयारी आहे, असे आश्वासन दार यांनी दिल्याचे या वृत्तात म्हटले आहे. तालिबान्यांनी गेल्या दोन वर्षांत प्रचंड हल्ले केले आहेत.