न्यू होरायझन्स यानाने केला पृथ्वीवर फोन
By admin | Published: July 16, 2015 03:53 AM2015-07-16T03:53:58+5:302015-07-16T03:53:58+5:30
अमेरिकेच्या नासा संघटनेने साडेनऊ वर्षांपूर्वी प्लुटो ग्रहावर पाठविलेले न्यू होरायझन्स यान ४.८८ अब्ज कि.मी. चा प्रवास पूर्ण करून प्लुटोजवळ पोहोचले
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या नासा संघटनेने साडेनऊ वर्षांपूर्वी प्लुटो ग्रहावर पाठविलेले न्यू होरायझन्स यान ४.८८ अब्ज कि.मी. चा प्रवास पूर्ण करून प्लुटोजवळ पोहोचले व प्लुटोला ओलांडून पुढे गेले. प्लुटोजवळून गेल्यानंतर या यानाने पृथ्वीवर फोन करून मोहीम यशस्वी झाल्याचा संदेश दिला आहे.
नासाचे न्यू होरायझन्स यान बर्फ व खडक असणारा प्लुटो हा लघुग्रह व त्याचे पाच चंद्र ओलांडून जागतिक वेळेनुसार ११.४९ वाजता पुढे गेले. ५० वर्षापूर्वी शोधलेल्या या लघुग्रहाचे पहिले सर्वेक्षण रात्री पूर्ण झाले. १३ तास होरायझन्स यान प्लुटोजवळ होते. सौरमालेतील अखेरच्या ग्रहाचे हे प्रथमच करण्यात आलेले संशोधन होते.
प्लुटो सिस्टीममधील ग्रहांच्या तीव्र प्रकाशातून हे यान सुखरूपपणे बाहेर पडल्याचे ते संकेत होते. न्यू होरायझन्सच्या या प्रवासात १० हजारात एक संधी अशीही होती, की धुळीचा एक कण आदळला असता तर यान पूर्णपणे नष्ट झाले असते.