Coronavirus : संक्रमण रोखण्यासाठी रामबाण ठरू शकते 'ही' लस, उंदरावरील प्रयोग यशस्वी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 10:36 AM2020-04-08T10:36:07+5:302020-04-08T10:41:32+5:30
यूनिव्हर्सिटी ऑफ जॉर्जिया आणि यूनिवर्सिटी ऑफ लोवामधील संशोधकांनी या लसीचा प्रयोग केला आहे. ही लस कोरोनावरील रामबाण सिद्ध होऊ शकते. संशोधकांनी एका उंदरावर हिचा प्रयोग केला असून तो यशस्वीही झाला आहे.
वॉशिंग्टन : कोरोनाने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. त्याने अमेरिकेतही थैमान घालायला सुरुवात केली आहे. येथे मंगळवारी एकाच दिवसांत 2,000 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. अशातच आता अमेरिकेमधून एक आशेचा किरण दिसून आला आहे. येथील यूनिव्हर्सिटी ऑफ जॉर्जिया आणि यूनिवर्सिटी ऑफ लोवामधील संशोधकांनी या लसीचा प्रयोग केला आहे. ही लस कोरोनावरील रामबाण सिद्ध होऊ शकते. संशोधकांनी एका उंदरावर हिचा प्रयोग केला असून तो यशस्वीही झाला आहे.
या लसीचे नाव आहे 'मर्स'. या संशोधकांनी उंदरावर प्रयोग करताना त्या उंदराला या नवीन मर्सचा (मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम) हैवी डोस दिला होता. ही नवीन लस, ज्या कोरोनाव्हायरसने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे, त्या कोरोना व्हायरस कोविड-19शी मोठ्या प्रमाणावर मिळतीजुळती आहे.
यूनिव्हर्सिटी ऑफ जॉर्जिया आणि यूनिव्हर्सिटी ऑफ लोवातील संशोधकांनी दावा केला आहे, की ही लस पेशींमध्ये रोगप्रतिकार शक्ती निर्माण करते. हिच्या प्रयोगानंतर आता कोविड-19 व्हायरसविरोधात लस तयार करण्याची आशा जागृत झाली आहे.
जर्नल एमबायोमध्ये प्रकाशित संशोधनानुसार, ही लस एक प्रकारची पॅराइंफ्लूएंझा व्हायरस (पीआय5) आहे, यात स्पाइक प्रोटीन असते.याचा वापर मर्स पेशींना संक्रमित करण्यासाठी होतो. मर्सचा हेवी डोस दिल्यानंतरही संबंधित उंदराला काहीही झालेले नाही.
यासंदर्भात बोलताना यूनिवर्सिटी ऑफ लोवाचे संशोधक प्राध्यापक पॉल मॅक्क्रे म्हणाले, पॅराइंफ्लूएंझा व्हायरस कोरोना व्हायरस महामारीविरोधात एक उपयुक्त लस सिद्ध होऊ शकतो, असे आमच्या अभ्यासात समोर आले आहे. आता हे संशोधक पॅराइंफ्लूएंझा व्हायरसवर आधारित वॅक्सीनचा प्राण्यांवर मोठ्या प्रमाणावर वापर करण्याच्या विचार करत आहेत. कारण मर्स आणि कोविड-19 हे दोन्हीही कोरोना व्हायरसमुळेच पसरले आहेत.
मर्स अधिक घातक आहे. मात्र, 2012 पासून पसरत असलेल्या या व्हायरसचे आतापर्यंत केवळ 2,494 रुग्णच आढळून आले आहेत. तर, वुहानमध्ये गेल्या डिसेंबर मध्ये उत्पन्न झालेल्या कोविड-19 व्हायरसचे जगभरात जवळपास 70 हजारहून अधिक रुग्ण समोर आले आहेत.