२३०० प्रकाश वर्षे अंतरावर आढळला नवा ग्रह
By admin | Published: November 3, 2014 02:48 AM2014-11-03T02:48:32+5:302014-11-03T02:48:32+5:30
पृथ्वीपासून २३०० प्रकाश वर्षे अंतरावरील कमी वस्तुमान व घनता असणारा नवा ग्रह शास्त्रज्ञांना सापडला असून, त्यावरील वातावरणात हायड्रोजन व हेलियम हे वायू आहेत.
वॉशिंग्टन : पृथ्वीपासून २३०० प्रकाश वर्षे अंतरावरील कमी वस्तुमान व घनता असणारा नवा ग्रह शास्त्रज्ञांना सापडला असून, त्यावरील वातावरणात हायड्रोजन व हेलियम हे वायू आहेत. हा ग्रह दिसणे कठीण होते, कारण त्याची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा नेहमी बदलते. कारण त्या सूर्यमालेतील इतर ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव या ग्रहावर पडत असल्याने त्याची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा मोठ्या प्रमाणावर बदलते.
या ग्रहाचे नाव पीएच ३ सी असे ठेवण्यात आले आहे. येल विद्यापीठातील विद्यार्थी व संशोधक जॉन श्मिट यांनी हा पेपर सादर केला आहे. पीएच ३ सी ची कक्षा १० प्रदक्षिणात १०.५ तासांनी बदलते. त्यामुळे अंतराळातील प्रकाशाचा वेध घेऊन संगणकाद्वारे केल्या जाणाऱ्या शोधात हा ग्रह सापडला नाही.
संशोधकांना हा ग्रह प्लॅनेट हंटर्स मोहिमेअंतर्गत सापडला आहे. येल व आॅक्सफर्ड विद्यापीठातर्फे ही मोहीम राबविली जाते. (वृत्तसंस्था)