इस्रायली पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱ्याने नवा वाद
By admin | Published: March 3, 2015 12:52 AM2015-03-03T00:52:39+5:302015-03-03T00:52:39+5:30
इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू इराणसोबतच्या आंतरराष्ट्रीय अणुकरारात खोडा घालण्यासाठी ‘ऐतिहासिक’ प्रयत्नांतर्गत अमेरिकेत पोहोचले आहेत.
वॉशिंग्टन : इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू इराणसोबतच्या आंतरराष्ट्रीय अणुकरारात खोडा घालण्यासाठी ‘ऐतिहासिक’ प्रयत्नांतर्गत अमेरिकेत पोहोचले आहेत. दुसरीकडे अणुकरारासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे. दरम्यान, अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या निमंत्रणाशिवायच नेत्यानाहू या दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे ओबामा प्रशासनही नाराज आहे.
नेतान्याहू यांच्या अमेरिका ‘वारी’तील एका सदस्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, ‘संभाव्य कराराबाबत आमच्याकडे काही माहिती आहे. आमच्या मते हा करार चुकीचा आहे.’ कराराबाबत मिळालेल्या महत्त्वपूर्ण माहितीच्या स्रोतांबाबत सांगण्यास या सूत्रांनी नकार दिला. नेतान्याहू मंगळवारी अमेरिकी संसद सदस्यांना संबोधित करणार आहेत. इराण व जागतिक महासत्तांत अणुकरार करारात इराणच्या अण्वस्त्र मोहिमेला रोखण्यासाठी त्यांच्यावर पर्याप्त कठोर सुरक्षा उपाय लागू करणे गरजेचे आहे;