सेकंदांत पाणी शुद्ध करणारा नवा पॉलीमर

By admin | Published: December 27, 2015 12:30 AM2015-12-27T00:30:46+5:302015-12-27T00:30:46+5:30

शास्त्रज्ञांनी काही सेकंदांत पाणी शुद्ध करू शकणारे नवे पॉलीमर विकसित केले आहे. विशेष म्हणजे या पॉलीमरचा अनेकदा पुनर्वापरही करता येतो.

New polymer that cleans water in seconds | सेकंदांत पाणी शुद्ध करणारा नवा पॉलीमर

सेकंदांत पाणी शुद्ध करणारा नवा पॉलीमर

Next

न्यूयॉर्क : शास्त्रज्ञांनी काही सेकंदांत पाणी शुद्ध करू शकणारे नवे पॉलीमर विकसित केले आहे. विशेष म्हणजे या पॉलीमरचा अनेकदा पुनर्वापरही करता येतो.
घरातील एअर फ्रेशनर ज्याप्रमाणे हवेतील दूषित घटक शोषून हवा ताजी करतो अगदी त्याचप्रमाणे हे पॉलीमर वाहत्या पाण्यातील घाण शोषून पाणी स्वच्छ करते. विशेष म्हणजे हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठीही एअर फ्रेशनरमध्ये वापरण्यात येणाराच सायक्लोडेक्सट्रिन हा पदार्थ वापरण्यात आला आहे. अमेरिकेच्या कोर्नेल विद्यापीठाचे सहयोगी प्रोफेसर विल डिचेल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सायक्लोडेक्सट्रिनचा सछिद्र अवतार तयार केला आहे.
सायक्लोडेक्सट्रिनच्या या अवतारात पारंपरिकरीत्या वापरण्यात येणाऱ्या सक्रिय कार्बनच्या तुलनेत प्रदूषकांना शोषून घेण्याची क्षमता काही बाबतीत २०० पटींहून अधिक दिसून आली. सायक्लोडेक्सट्रिनच्या जुन्या पॉलीमरच्या तुलनेत सक्रिय कार्बनचे पृष्ठभागावरील क्षेत्रफळ तर जास्त असते; परंतु जेवढ्या
शक्तीने सायक्लोडेक्सट्रिन प्रदूषकांना बांधून ठेवू शकतो, तेवढी
शक्ती सक्रिय कार्बन दाखवू शकत नाहीत.
डिचेल म्हणाले की, हे पदार्थ वाहत्या पाण्यातून काही सेकंदांतच प्रदूषणकारी घटक नष्ट करतील. सायक्लोडेक्सट्रिनयुक्त पॉलीमरचे फेरउत्पादन सहज आणि किफायतशीररीत्या केले जाऊ शकते.
या पॉलीमरचा कितीतरी वेळा पुन्हा पुन्हा वापर करता येऊ शकतो आणि तरीही त्याच्या कामगिरीत थोडीही घट होत नाही. नव्या पॉलीमरबाबतचे हे निष्कर्ष नेचर या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

Web Title: New polymer that cleans water in seconds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.