कृत्रिम सूर्याचा नवा विक्रम; १० कोटी अंश तापमान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 06:13 AM2024-04-04T06:13:26+5:302024-04-04T06:13:56+5:30
Artificial Sun: दक्षिण कोरियाच्या शास्त्रज्ञांनी कृत्रिम सूर्यामध्ये १०० दशलक्ष अंश सेल्सिअस तापमान ४८ सेकंदांपर्यंत मेंटेन करण्याचा जागतिक विक्रम केला आहे. हे तापमान सूर्याच्या गाभ्यापेक्षा सातपट जास्त आहे.
सियोल - दक्षिण कोरियाच्या शास्त्रज्ञांनी कृत्रिम सूर्यामध्ये १०० दशलक्ष अंश सेल्सिअस तापमान ४८ सेकंदांपर्यंत मेंटेन करण्याचा जागतिक विक्रम केला आहे. हे तापमान सूर्याच्या गाभ्यापेक्षा सातपट जास्त आहे. २०२१ मध्ये ३० सेकंदांचा विक्रम झाला होता.
शास्त्रज्ञांनी कोरिया सुपरकंडक्टिंग टोकामॅक ॲडव्हान्स्ड रिसर्च उपकरण तयार केले. यात हे तापमान न्यूक्लियर फ्युजन प्रयोगांदरम्यान तयार करण्यात आले. हा प्रयोग २०२३ ते फेब्रुवारी २०२४ दरम्यान करण्यात आला.
फायदे काय?
-कार्बन प्रदूषणाशिवाय अमर्यादित ऊर्जा प्रदान करण्याची क्षमता
-न्यूक्लियर फिजनप्रमाणे यात धोका नाही.
- आण्विक कचरा नाही.