उ.कोरियावर नवे निर्बंध

By admin | Published: February 20, 2016 02:52 AM2016-02-20T02:52:06+5:302016-02-20T02:52:06+5:30

हायड्रोजन बॉम्बची चाचणी आणि त्यानंतर रॉकेटचे प्रक्षेपण करणाऱ्या उत्तर कोरियाविरुद्ध कारवाईचा फास आवळत नव्याने प्रतिबंध घालण्यात आले आहेत

A. New restrictions on Korea | उ.कोरियावर नवे निर्बंध

उ.कोरियावर नवे निर्बंध

Next

वॉशिंग्टन : हायड्रोजन बॉम्बची चाचणी आणि त्यानंतर रॉकेटचे प्रक्षेपण करणाऱ्या उत्तर कोरियाविरुद्ध कारवाईचा फास आवळत नव्याने प्रतिबंध घालण्यात आले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी याबाबतच्या प्रतिबंधावर स्वाक्षरी केली आहे.
व्हाईट हाऊसने याबाबत माहिती देताना म्हटले आहे की, काँग्रेसने मंजूर केलेल्या याबाबतच्या उपाययोजना स्वीकारण्यात आल्या आहेत. यानुसार उत्तर कोरियाकडून अण्वस्त्र वा हत्याराशी संबंधित तंत्रज्ञान कुणालाही घेता येणार नाही. किंवा आयात करता येणार नाही. व्हाईट हाऊसचे प्रवक्ते जोश हर्नेस्ट म्हणाले की, उत्तर कोरियातील घडामोडींमुळे येथील प्रशासन चिंतेत आहे. या प्रतिबंधामुळे उत्तर कोरियावर दबाव वाढेल अशी आम्हाला आशा आहे.
गेल्या महिन्यात उत्तर कोरियाने केलेल्या हायड्रोजन बॉम्बच्या चाचणीचे आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र पडसाद उमटले. उत्तर कोरियाने एका रॉकेटचे प्रक्षेपण केले.
दरम्यान, हे तर बॅलेस्टिक मिसाईल असल्याचा दावा काही राष्ट्रांकडून करण्यात येत आहे. यामुळे उत्तर कोरियाने पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या नियमांचे उल्लंघन केले.
या विधेयकानुसार आता प्रतिबंधित कारवाया करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल. जसे की, संपत्तीची जप्ती, व्हिसा रोखणार आणि सरकारी ठेकेदारीवरही प्रतिबंध अशा कारवाईचा यात समावेश आहे.
.......

Web Title: A. New restrictions on Korea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.