'नासा'ला मिळालं मोठं यश , शोधली आठ ग्रहांची नवी सूर्यमाला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2017 06:32 PM2017-12-15T18:32:14+5:302017-12-15T18:32:38+5:30
आपल्या सूर्यमालेत सूर्याभोवती ग्रह फिरतात, त्याचप्रमाणे नव्या सूर्यमालेतही ‘केप्लर 90’ नावाच्या ताऱ्याभोवती इतर ग्रह फिरताना दिसत आहेत. आपल्या सूर्यमालेप्रमाणेच येथे छोटे ग्रह ता-यापासून जवळ आहेत तर मोठे ग्रह ता-यापासून दूर आहेत.
लंडन: अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था 'नासा'ला मोठं यश मिळालं आहे. 'केपलर स्पेस टेलिस्कोप'द्वारे नासाने पृथ्वी इतक्याच मोठ्या नव्या सूर्यमालेचा शोध लावला आहे. या सूर्यमालेत आठ ग्रह आहेत. याबाबतचा व्हिडिओ 'नासा'ने ट्विट केला आहे.
Our @NASAKepler mission's search for new planets teamed with machine learning to discover another solar system with an 8th planet that is 2,500 light-years away. Here’s what you need to know about the #Kepler90 discovery: https://t.co/2JpIr7p4pEpic.twitter.com/nqvLw5mlSv
— NASA (@NASA) December 14, 2017
ही नवी सूर्यमाला पृथ्वीपासून 2 हजार 545 प्रकाशवर्षे दूर आहे. नवी सूर्यमाला पृथ्वीच्या तुलनेत 30 टक्क्यांनी मोठी आहे. पृथ्वीसारखा एखादा ग्रह या सूर्यमालेत आहे की नाही हे अजून स्पष्ट झालेलं नाही. पण आपल्या सूर्यमालेत सूर्याभोवती ग्रह फिरतात, त्याचप्रमाणे नव्या सूर्यमालेतही ‘केप्लर 90’ नावाच्या ताऱ्याभोवती इतर ग्रह फिरताना दिसत आहेत. आपल्या सूर्यमालेप्रमाणेच येथे छोटे ग्रह ता-यापासून जवळ आहेत तर मोठे ग्रह ता-यापासून दूर आहेत.
नवी सूर्यमाला पृथ्वीच्या तुलनेत 30 टक्क्यांनी मोठी आहे. तुम्हाला भेट द्यायला आवडेल अशी ही सूर्यमाला नाही. येथील तापमान माणसाला सहन होणार नाही इतकं जास्त आहे असं मत अँड्र्यू व्हेंडरबर्ग या खगोलशास्त्रज्ञांनी नोंदवलं आहे.