नव्या राज्यघटनेवरून जल्लोष अन् हिंसाचार
By admin | Published: September 21, 2015 11:22 PM2015-09-21T23:22:19+5:302015-09-21T23:22:19+5:30
नव्या राज्यघटनेवरून नेपाळच्या अनेक भागांत जल्लोषाचे वातावरण असले तरी काही भागात मात्र हिंसक घटना घडत आहेत
Next
काठमांडू : नव्या राज्यघटनेवरून नेपाळच्या अनेक भागांत जल्लोषाचे वातावरण असले तरी काही भागात मात्र हिंसक घटना घडत आहेत. पोलिसांनी नव्या राज्यघटनेविरुद्ध आंदोलन करत असलेल्या मधेसी कार्यकर्त्यांवर सोमवारी गोळीबार केला. यात तीन जण जखमी झाले. दरम्यान, पंतप्रधान सुशील कोईराला यांनी आंदोलन करत असलेल्या संघटनांना चर्चेसाठी निमंत्रित केले आहे.
राष्ट्राध्यक्ष रामबरन यादव यांनी रविवारी नव्या राज्यघटनेची घोषणा केल्यानंतर नेपाळ धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक देशात रूपांतरित केला. राज्यघटना लागू होण्याची घोषणा होताच जॉइंट मधेसी फ्रंटच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी निदर्शने सुरू केली. (वृत्तसंस्था)