चीनमध्ये सापडला कोरोनाचा नवा व्हेरिएंट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 11:38 AM2021-12-17T11:38:42+5:302021-12-17T11:39:00+5:30
कोविड-१९ डेल्टा व्हेरिएंटच्या सब स्ट्रेनचे पूर्व चीनचा औद्योगिक प्रांत झेझियांगमध्ये एका आठवड्यात १९० रुग्ण आढळले.
कोविड-१९ डेल्टा व्हेरिएंटच्या सब स्ट्रेनचे पूर्व चीनचा औद्योगिक प्रांत झेझियांगमध्ये एका आठवड्यात १९० रुग्ण आढळले. याचा परिणाम ५ लाखांपेक्षा जास्त रहिवाशांना लॉकडाऊनला तोंड द्यावे लागणे व कारखाने बंद करावे लागण्यात झाला.
सोमवार दुपारपर्यंत अनेकांना डेल्टा स्ट्रेन सब लिनिएज एवाय.४ची बाधा झाल्याचे निदान झाले होते. यामुळे या प्रांतात मोठ्या प्रमाणावर प्रवास निर्बंध लादले गेले. झेझियांगमध्ये ६ ते १३ डिसेंबर दरम्यान स्थानिक पातळीवर बाधा झालेले रुग्ण समोर आले. यावर्षी या प्रांतात पहिला उद्रेक झाल्याचे रुग्णांच्या अधिकृत संख्येवरून दिसले.
चीनच्या तियानजिन या उत्तरेकडील शहरात कोविड-१९च्या ओमायक्रॉन विषाणूची बाधा झालेला पहिला रुग्ण आढळला, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटले. ९ डिसेंबर रोजी विदेशातून तियानजिन शहरात आलेल्या या प्रवाशात हा विषाणू आढळला, असे चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमाने म्हटले. या प्रवासी रुग्णावर रुग्णालयात विलगीकरणात उपचार सुरू आहेत.