नवा व्हायरस? रशियामध्ये हडकंप! हजारो पक्ष्यांचा रहस्यमयी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 16:12 IST2021-10-03T16:11:06+5:302021-10-03T16:12:33+5:30
एका व्हिडीओमध्ये एक पक्षी गोल गोल फिरत खाली पडताना दिसत होता. या पक्षाची तंत्रिका खराब झाली होती. हे पक्षी विषामुळे मृत झाल्याची शक्यता कमी आहे.

नवा व्हायरस? रशियामध्ये हडकंप! हजारो पक्ष्यांचा रहस्यमयी मृत्यू
मॉस्को : मृत पक्ष्यांचे अनेक फोटो गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामुळे लोकांमध्ये खळबळ उडाली आहे. क्रिमियाच्या अजोव समुद्र किनाऱ्यावर Arabat Spit वर मृत पक्ष्यांच्या रांगा दिसत आहेत. जवळपास 7000 हून अधिक काळ्या मानेच्या ग्रीब्स, समुद्री कबुतर आणि गुल पक्षी मृत झाले आहेत. Crimean Federal University चे ग्रिगोरी प्रोकोपोव यांनी सांगितले की, आम्ही मोठ्या प्रमाणावर मृत पक्ष्यांची नोंद केली आहे. हा आकडा काही हजारांत आहे. (mysterious death of thousands of birds in Russia, virus or pollution who strangled them?)
वैज्ञानिकांनुसार एखादा खतरनाक व्हायरस या पक्ष्यांच्या मृत्यू मागे असू शकतो. एका व्हिडीओमध्ये एक पक्षी गोल गोल फिरत खाली पडताना दिसत होता. या पक्षाची तंत्रिका खराब झाली होती. हे पक्षी विषामुळे मृत झाल्याची शक्यता कमी आहे. एक पक्षी आजारी असताना आम्हाला मिळाला होता, त्याचा अभ्यास करण्यात आला आहे. त्याचे वागणे जाणून घेतले आहे, परंतू त्याचा मृत्यू झाला आहे.
प्रोकोपोव यांनी सांगितले की, पक्षी आणि केंद्रीय तंत्रिका जी या पक्ष्यांना दिशा आणि अन्य संकेत देते ती संकटात आहे. हा एखाद्या प्रकारचा व्हायरस असू शकतो. पश वैज्ञानिकांच्या तपासणीच्या आधारेच यावर काही सांगितले जाऊ शकते. संक्रमक रोगासाठी त्यांनी विष आणि पर्यावरण परिस्थीती करणीभूत ठरण्याची शक्यता व्यक्त केली.
स्थानिक लोकांनी पक्ष्यांचा मृत्यूसाठी त्या भागातील मोठ्या प्रमाणावरील प्रदूषण कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. गेल्या काही काळात या भागात उच्च स्तरावरील मर्क्युरी मिसळत असल्याचा इशारा देण्यात आला होता. फेडरल सेंटर फॉर एनिमल हेल्थचे तज्ज्ञ या ठिकाणी काम करत आहेत. मृत पक्ष्यांची तपासणी केली जात आहे.