न्यूयॉर्क शहर पाण्याखाली! मुसळधार पावसामुळे अचानक पूर आला; आपत्कालीन परिस्थिती जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 09:42 PM2023-09-29T21:42:03+5:302023-09-29T21:46:13+5:30
लोक गुडघ्यापर्यंत पाण्यातून जातानाचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत.
भारतातील शहरे पुराचा तडाखा झेलत असताना तिकडे अमेरिकेचे महत्वाचे शहर पाण्याखाली गेले आहे. अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे न्यू यॉर्क शहर बुडाले असून प्रशासनाने आपत्कालीन परिस्थिती जाहीर केली आहे.
शहरातील अनेक भुयारी मार्ग, रस्ते आणि महामार्गांवर पूर आला आहे. तसेच लागार्डिया विमानतळावरील एक टर्मिनल बंद झाले आहे. एका रात्रीत पाच ते आठ इंचाचा पाऊस झाल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे, असे न्यूयॉर्क राज्याचे गव्हर्नर कॅथी हॉचुल यांनी सांगितले. हे एक धोकादायक, जीवघेणे वादळ आहे, असे ते म्हणाले.
New York City emergency officials have issued a travel advisory as heavy rain and flooding hits https://t.co/E30q97yK2Opic.twitter.com/xw1EgGvXmM
— philip lewis (@Phil_Lewis_) September 29, 2023
अतिवृष्टीमुळे मी न्यूयॉर्क शहर, लाँग आयलंड आणि हडसन व्हॅलीमध्ये आणीबाणीची स्थिती घोषित करत आहे. नागरिकांनी सुरक्षित स्थळी रहावे. तसेच नागरिकांनी पुराचे पाणी असलेल्या भागातून प्रवास करून नये, असे आवाहन हॉचुल यांनी केले आहे. लोक गुडघ्यापर्यंत पाण्यातून जातानाचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत.
Things started getting difficult #Brooklyn gets flooded with waters.
— Shadab Javed (@JShadab1) September 29, 2023
Please share this. Follow for more updates. #flashflood#flashflooding#flooding#flood#newyork#newyorkcity#nyc#brooklyn#rain#rainstorm#storm#downpour#streetfloodingpic.twitter.com/1nmceycM1b