बापरे! टाय न घातल्यामुळे खासदाराला संसदेतून काढलं बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 06:44 PM2021-02-10T18:44:16+5:302021-02-10T18:55:35+5:30
Rawiri Waititi : माओरी आदिवासी वंशाचे असलेले खासदार राविरी वॅटिटी यांनी नेक टाय घालण्यास नकार दिला.
वेलिंग्टन - प्रत्येक देशाच्या संसदेचे काही नियम असतात. न्यूझीलंडच्या संसदेत एका खासदाराने नेक टाय न घातल्यामुळे त्यांना सभागृहाबाहेर काढण्यात आल्याची घटना समोर आली आहे. माओरी आदिवासी वंशाचे असलेले खासदार राविरी वॅटिटी (Rawiri Waititi) यांनी नेक टाय (necktie) घालण्यास नकार दिला होता. त्यामुळे सभागृह अध्यक्षांनी त्यांना सभागृहाबाहेर जाण्यास सांगितलं आहे.
माओरी आदिवासी नेते राविरी वॅटिटी यांनी हा फक्त टायचा मुद्दा नाही. तर सांस्कृतिक अस्मितेचाही प्रश्न असल्याचं म्हटलं आहे. तसेच न्यूझीलंडच्या संसदेमध्ये टाय घालण्याचा नियम आधुनिक पद्धतीला साजेसा नाही. मेक्सिन वंशाचे खासदार त्यांच्या परंपरेप्रमाणे टाय बांधतात. त्यावर कुणी आक्षेप घेत नाही. मात्र आमच्या सारख्या आदिवासी समाजालाच याची सक्ती का केली जाते? असा प्रश्न त्यांनी विचारला. तसेच टाय घालणे हे गुलामीचे प्रतिक असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.
राविरी वॅटिटी यांनी सभागृहात प्रश्न विचारण्यास सुरुवात केल्यानंतर सभागृह अध्यक्ष ट्रेवर मलार्ड यांनी त्यांना रोखलं आणि नियम सांगत नेक टाय असेल तरच प्रश्न विचारण्यास परवानगी देऊ असं म्हटलं आहे. तर वॅटिटी यांनी नेक टाय प्रश्न विचारणार असल्याचं सांगत तो घालण्यास स्पष्ट नकार दिला. तेव्हा त्यांना सभागृहाबाहेर जाण्यास सांगण्यात आलं. मलार्ड यांनी नेकटायचा नियम आता जुना झाला असल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
Corona Vaccine : कोरोना लसीबाबत लोकांमध्ये भीतीचं वातावरण असतानाच मौलवींनी केला अजब दावाhttps://t.co/Rv1FIBkcw4#coronavirus#CoronaVaccine#CoronaVirusUpdatespic.twitter.com/Y5NrIl4Shv
— Lokmat (@MiLOKMAT) February 10, 2021