वेणी खेचल्याने न्यूझीलंडच्या पंतप्रधानांना मागावी लागली महिलेची माफी

By admin | Published: April 22, 2015 05:06 PM2015-04-22T17:06:32+5:302015-04-22T17:12:00+5:30

हॉटेलमधील महिला वेटरची मस्करीत वेणी खेचणे न्यूझीलंडचे पंतप्रधान जॉन की यांना चांगलेच महागात पडले आहे.

New Zealand PM apologizes to women | वेणी खेचल्याने न्यूझीलंडच्या पंतप्रधानांना मागावी लागली महिलेची माफी

वेणी खेचल्याने न्यूझीलंडच्या पंतप्रधानांना मागावी लागली महिलेची माफी

Next

 ऑनलाइन लोकमत 

वेलिंग्टन, दि. २२ - हॉटेलमधील महिला वेटरची मस्करीत वेणी खेचणे न्यूझीलंडचे पंतप्रधान जॉन की यांना चांगलेच महागात पडले आहे. संबंधीत वेटरने पंतप्रधानांच्या या कृतीमुळे मनस्ताप होत असल्याची व्यथा मांडताच जॉन की यांनी त्या महिलेची जाहीर माफी मागितली आहे. 
न्यूझीलंडमधील ऑकलँड येथील हॉटेलमध्ये काम करणा-या महिला वेटरने द डेली ब्लॉग या वेबसाईटवर ही घटना सांगितली आहे  या महिला वेटरने तिचे नाव जाहीर केलेले नाही. ब्लॉगमध्ये ती  म्हणते, जॉन की यांनी किमान सहा वेगवेगळ्या प्रसंगी माझी वेणी ओढली. मी दरवेळी या प्रकारावर नाराजी व्यक्त केली व असा प्रकार पुन्हा केल्यास मी ठोशा मारीन अशी धमकीही त्यांना दिली होती. एकदा त्यांच्या पत्नीनेदेखील जॉन कि यांना बिचा-या मुलीला ऐवढा त्रास देऊ नका असे सांगितल्याचे तिने म्हटले आहे. मात्र जॉन की यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही. महिनाभरापूर्वी त्यांनी जाहीररित्या माझी माफी मागितली. मी करत असलेल्या मस्करीने तुम्हाला ऐवढा त्रास होईल असे वाटले नव्हते असे जॉन की यांनी त्या महिला वेटरला सांगितले. न्यूझीलंडच्या पंतप्रधान कार्यालयानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 

 

Web Title: New Zealand PM apologizes to women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.