हृदयद्रावक! अवघ्या 7 दिवसांचं बाळ रस्त्यावर रडताना सापडलं; सोबत होती चिठ्ठी, लिहिलेलं...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 02:46 PM2023-04-15T14:46:27+5:302023-04-15T14:53:36+5:30
रस्त्यावर एक नवजात बाळ सापडलं तसेच त्या मुलाजवळ एक चिठ्ठीही होती. ही चिठ्ठी वाचून लोकांना धक्का बसला आहे
जगभरात विविध ठिकाणी लहान मुलांची अनेक प्रकरणे समोर येत असतात. अशीच एक धक्कादायक घटना इटलीतील रोम शहरातून समोर आली आहे. रस्त्यावर एक नवजात बाळ सापडलं तसेच त्या मुलाजवळ एक चिठ्ठीही होती. ही चिठ्ठी वाचून लोकांना धक्का बसला आहे. हे बाळ बराच वेळ रडत होतं आणि त्याच्या जवळ कोणीही पोहोचलं नव्हतं. ही चिठ्ठी त्याच्या आईने लिहिली असल्याचेही सांगण्यात आलं.
इटलीच्या रोम शहरात ही घटना घडली आहे. आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे बाळ रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानाजवळ आढळून आलं. बाळ सात दिवसांचं असल्याचं सांगण्यात येत आहे. मुलगा बराच वेळ तिथेच पडून रडत होता. एवढेच नाही तर त्या दुकानाजवळ क्लिनिक असल्याचेही सांगण्यात आले. मुलाची आई त्याच क्लिनिकमध्ये त्याची तपासणी करण्यासाठी आली होती असं चिठ्ठीमध्ये म्हटलं आहे.
एका मीडिया रिपोर्टनुसार, महिलेने स्वतःच्या नवजात मुलाला सोडून दिलं. तिने स्वत: एका चिठ्ठीत मुलाचं नाव एनिया असं लिहिलं आहे. बाळ पूर्णपणे निरोगी असल्याचं देखील लिहिलं आहे. त्याच्या सर्व चाचण्या रुग्णालयात करण्यात आल्या असून सर्व काही ठीक आहे. याशिवाय त्या चिठ्ठीत दुसरे काहीही लिहिलेलं नव्हतं.
सध्या या बाळाला प्रशासनातील संबंधित विभागाकडे सुपूर्द करण्यात आले असून, बाळाची काळजी घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. रोम शहरातील ही पहिलीच घटना नाही, गेल्या काही काळात अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. नुकतेच एका महिलेने आपल्या नवजात मुलीला रुग्णालयात सोडले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"