बाबो! रुग्णालयातून चोरीला गेलं होतं नवजात बाळ; तब्बल 16 वर्षांनी आई वडिलांनी शोधलं लेकाला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 01:14 PM2022-02-23T13:14:10+5:302022-02-23T13:17:03+5:30

तब्बल 16 वर्षांपूर्वी रुग्णालयातून नवजात बाळ चोरीला गेलं होतं आणि त्याला शोधण्यात आता आई-वडिलांना शोधण्यात यश आले आहेत.

newborn child was stolen from the hospital after 16 years parents found him | बाबो! रुग्णालयातून चोरीला गेलं होतं नवजात बाळ; तब्बल 16 वर्षांनी आई वडिलांनी शोधलं लेकाला

बाबो! रुग्णालयातून चोरीला गेलं होतं नवजात बाळ; तब्बल 16 वर्षांनी आई वडिलांनी शोधलं लेकाला

googlenewsNext

आई-वडील आपल्या मुलाची अत्यंत काळजी घेतात. त्यांच्या सुखासाठी वाटेल ते करतात. मुलांना थोडीशी जरी काही दुखापत झाली अथवा ते आजारी पडले तरी त्यांची चिंता वाढते. पण अनेकदा पालकांची नजर चुकवून मुलं हरवतात किंवा त्यांच्यासोबत एखादी दुर्घटना घडते. तर काही वेळा रुग्णालयातून बाळ चोरीला गेल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. अशीच एक घटना आता समोर आली आहे. तब्बल 16 वर्षांपूर्वी रुग्णालयातून नवजात बाळ चोरीला गेलं होतं आणि त्याला शोधण्यात आता आई-वडिलांना शोधण्यात यश आले आहेत. 

मॅक्सिकोत राहणाऱ्या यासिर मॅशिअल (Yasir Macias) आणि रोजलिया लोपेज (Rosalia Lopez)  यांनाही अशा प्रसंगातून जावं लागलं आहे. 2005 या वर्षी या जोडप्याला एक मुलगा झाला. दोघंही मुलाच्या जन्मानंतर खूश झाले होते. मात्र 15 डिसेंबर 2005 रोजी रुग्णालयातून बाळ चोरीला गेलं. त्यानंतर 16 वर्ष शोध घेतल्यानंतर अखेर मुलाचा शोध लागला आहे. 15 डिसेंबर 2005 च्या रात्री लोपेज यांना IMSS हॉस्पिटल जनरल रीजनलमध्ये दाखल करण्यात आले होते. मुलाच्या जन्मानंतर तिला काही दिवस रुग्णालयात ठेवण्यात आले होते. त्या रात्री एक महिला नर्स बनून हॉस्पिटलमध्ये आली आणि लोपेजकडून मुलाला घेऊन तिला आराम करण्यास सांगितले. 

आपल्या मुलाला या जोडप्याने तेव्हा पाहिले ते शेवटचे होते. बाळ चोरीला गेल्याचं कळल्यानंतर त्यांना धक्का बसला. हे दु:ख त्यांनी 16 वर्षे भोगलं. जोडप्याला 16 वर्षांनंतर आपल्या मुलाला भेटण्याची संधी मिळाली. पण मुलाला शोधणे सोपे नव्हते. मुलाचा शोध घेण्यासाठी त्यांनी एका तज्ज्ञाची मदत घेतली. गेल्या वर्षी सप्टेंबर 2021 मध्ये जलिस्को इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्सेसने मुलाच्या जुन्या फोटोवरून चेहऱ्याचे सखोल विश्लेषण केले आणि 16 वर्षांनंतर मूल कसे दिसत असेल याचा अंदाज लावला. त्यानुसार मुलाचे चित्र तयार केले गेले आणि पुन्हा शोध सुरू झाला. 

1-2 महिने शोध घेतल्यानंतर तपास पथकाला चित्रासारखाच एक तरुण सापडला. त्यानंतर टीमने त्याचा आणि जोडप्याचा डीएनएन जुळवला. दोघांचे डीएनए 99.9 टक्के जुळले. डीएनए जुळल्यानंतर तो मुलगा महिलेचा असल्याचं सिद्ध झालं. या चाचणीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. मात्र, तपास अधिकारी अद्याप महिला चोराचा शोध घेत आहेत. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: newborn child was stolen from the hospital after 16 years parents found him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.