सेक्सच्या वेळी डोळ्यावर पट्टी बांधायचा, मग पतीबाबत झाला धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 08:57 PM2022-06-21T20:57:11+5:302022-06-21T20:59:26+5:30
Crime News : पीडित महिलेने पोलिसात तक्रार केली आणि प्रकरण कोर्टात पोहोचले.
लग्नानंतर काही महिन्यांनी एका महिलेला आपल्या पतीबाबत अशी माहिती मिळाली आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. वास्तविक, महिलेने ज्या व्यक्तीशी लग्न केले ती महिलाच निघाली. त्यानंतर पीडित महिलेने पोलिसात तक्रार केली आणि प्रकरण कोर्टात पोहोचले.
'डेली स्टार'च्या वृत्तानुसार, ही घटना इंडोनेशियातील आहे, जिथे गेल्या आठवड्यात एका महिलेने कोर्टात सांगितले की, तिने ज्या व्यक्तीशी पुरुष असल्याने लग्न केले होते, तिला 10 महिन्यांनी समजले की, ती एक महिला आहे. वास्तविक, आरोपी महिलेने ओळख लपवून लग्न केले होते. सध्या गुन्हा दाखल करणाऱ्या महिलेची ओळख उघड झाली नसून आरोपी महिलेचे नाव एरायनी असल्याचे सांगण्यात आले आहे.
रिपोर्टनुसार, महिला आणि एरायनी यांची भेट मे 2021 मध्ये डेटिंग अॅपद्वारे झाली होती. महिलेने सांगितले की, एरायनी तिच्या सोशल मीडिया प्रोफाइल आणि संभाषणातून पुरुषासारखी दिसत होती. एरायनी याने महिलेला सांगितले की, तो सर्जनचा व्यवसाय करतो. त्याने नुकतेच धर्मांतर केले आहे आणि तो पत्नीच्या शोधात आहे.
महिलेच्या पालकांना संशय आला
तब्बल तीन महिने बोलून महिलेने एरायनीशी लग्न केले. लग्नानंतर एरायनी महिलेच्या घरी राहू लागली. पण लग्नाच्या काही महिन्यांनंतर, महिलेच्या पालकांना काहीतरी गडबड असल्याचा संशय येऊ लागला, कारण एरायनी पीडित महिलेकडून पैसे मागत राहिली आणि तिच्या नोकरी/व्यवसायाबद्दल लपवत राहिली.
अशा परिस्थितीत कौटुंबिक प्रश्न टाळण्यासाठी तो महिलेला दक्षिण सुमात्रा या दुसऱ्या शहरात घेऊन गेला आणि तेथे भाड्याचे घर घेऊन राहू लागला. तेथे त्याने महिलेला अनेक महिने घरात डांबून ठेवले आणि तिला कोणाशीही बोलण्यास बंदी घातली. येथे अनेक दिवस मुलीशी बातचीत नसल्याने महिलेच्या कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी लवकरच एरायनीचा शोध घेतला आणि चौकशीत जे काही समोर आले ते पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.