न्यूज अँकरने ऐकवली पोप फ्रान्सिस यांच्या मृत्यूची बातमी, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2021 01:07 PM2021-12-26T13:07:16+5:302021-12-26T13:07:58+5:30

न्यूज अँकरने पोप फ्रान्सिस यांच्या मृत्यूची बातमी ऐकवली, पण चुक लक्षात आल्यावर तात्काळ माफी मागितली.

News anchor announces news of Pope Francis' death, apologies after that; video goes viral on social media | न्यूज अँकरने ऐकवली पोप फ्रान्सिस यांच्या मृत्यूची बातमी, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

न्यूज अँकरने ऐकवली पोप फ्रान्सिस यांच्या मृत्यूची बातमी, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Next

काल म्हणजेच 25 डिसेंबरला जगभरात नाताळाचा सण उत्साहात साजरा झाला. नाताळाच्या दिवशी ख्रिश्चन धर्माचे धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी जनतेला संबोधित केले. पण, यादरम्यान एका परदेशी वाहिनीच्या अँकरने चुकून त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकवली. इतकी मोठी चुक झाल्याचे समजताच अँकरने माफी मागून पुढील बातम्या सुरू ठेवल्या. दरम्यान, या घटनेनंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. 

अँकरने मागितली माफी, व्हिडिओ व्हायरल

द सनच्या रिपोर्टनुसार, अँकर काइली पेंटेलो ख्रिसमसच्या दिवशी शो करत होती. कोरोना लसीबद्दल बोलण्याऐवजी तिने आपल्या शोमध्ये ही एवझी मोठी चूक केली. आयटीव्ही न्यूज स्टुडिओमधून एक कार्यक्रम करत असताना लसीकरणावर बोलण्याऐवजी तिने पोप फ्रान्सिस यांच्या निधनाची बातमी ऐकवली. यानंतर तिला आपली चुक लक्षात आली आणि तिने तात्काळ माफी मागितली.

व्हिडिओवर विविध कमेंट

अँकर काइली पेंटेलोने आपल्या चुकीबद्दल माफी मागितली असली तरी हा व्हिडिओ लगेचच सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यावर विविध कमेंट्स येत आहेत. एका युजरने ट्विटरवर लिहिले की, आयटीव्ही न्यूजवरील अँकरने पोपचा अपघाती मृत्यू झाल्याची घोषणा केली. दुसऱ्या एका युजरने गंमतीत म्हटले की, 'पोपचा पुढील सहा तासांत मृत्यू झाला तर पोलिस ITV न्यूजची दार ठोठावतील. ही बातमी ऐकून एका यूजरने चिंता व्यक्त केली आणि पोप ठीक असल्याचे सांगितले. 

पोप यांचे जनतेला संबोधन
फ्रान्सिस पोप सध्या 85 वर्षांचे आहेत. काल म्हणजेच ख्रिसमसच्या दिवशी व्हॅटिकनमधून त्यांनी ख्रिश्चन धर्मियांना संबोधित केले. कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या सावटाखाली जगाने नाताळ साजरा केला. त्यात लोकांची गर्दी खूप कमी असली तरी आणि कोरोना प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन केले जात होते.

Web Title: News anchor announces news of Pope Francis' death, apologies after that; video goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.