India China FaceOff: चीन चवताळला! पुढच्या वेळी अमेरिकाही मदतीला येणार नाही; भारताला धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 07:24 PM2020-09-01T19:24:27+5:302020-09-01T19:25:51+5:30

India China FaceOff: चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने संपादकीयमध्ये गरळ ओकली आहे. भारतीय सैन्य चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीपासून संरक्षण करू शकत नाही. एवढेच नाही तर  भारत चीनसोबत युद्ध करत असेल तर अमेरिकाही त्यांच्या मदतीला येणार नाही, अशी धमकी दिली आहे. 

Next time, the United States will not come to help; China Threat to India | India China FaceOff: चीन चवताळला! पुढच्या वेळी अमेरिकाही मदतीला येणार नाही; भारताला धमकी

India China FaceOff: चीन चवताळला! पुढच्या वेळी अमेरिकाही मदतीला येणार नाही; भारताला धमकी

googlenewsNext

लडाखमधील पेंगाँग झीलच्या परिसरात सोमवारी चीनच्या सैनिकांना हुसकावल्यावरून चीन चवताळला आहे. गेल्या तीन महिन्यांती दुसऱ्यांदा नामुष्की सहन करावी लागल्याने आता भारताला पुढच्या वेळी चीन सैन्याच्या कारावाईनंतर अमेरिकाही मदतीला येऊ शकणार नाही, अशी धमकीच देऊन टाकली आहे. 


चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने संपादकीयमध्ये गरळ ओकली आहे. भारतीय सैन्य चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीपासून संरक्षण करू शकत नाही. एवढेच नाही तर  भारत चीनसोबत युद्ध करत असेल तर अमेरिकाही त्यांच्या मदतीला येणार नाही, अशी धमकी दिली आहे. 


भारताने जर त्याची सैन्य ताकद दाखविली तर चिनी सैन्य 1962 पेक्षाही जास्त नुकसान करेल, असे ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे. मात्र, 1962 आणि 2020 मधील भारताची ताकद किती वाढली आहे, हे चीनचे वृत्तपत्र विसरले आहे. यामध्ये खूप मोठे अंतर आहे. जर चीनने कोणतीही आगळीक केली तर भारतीय सैन्याने दोनदा प्रत्यूत्तर काय असते याची प्रचिती दिली आहे. यामुळे चीनला भोगावे लागणार आहे. 


पुढे लिहिले आहे की, चीन इंच इंच जमिनीचे संरक्षण करणे जाणतो. भारताविरोधात सरकारला चिनी जनतेचे मोठे समर्थन आहे. यामुळे चीनच्या भागात अतिक्रमण करण्याची परवानगी दिली जाणार नाही. चीन भारतापेक्षा अनेक पटींना ताकदवान आहे. यामुळे भारत आणि चीनमध्ये कोणतीही स्पर्धा नाही. अमेरिकेसोबत मिळून चीनला आपण टक्कर देऊ शकतो, हा भारतीयांचा भ्रम आम्हाला तोडायचा आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

Post Office: पोस्ट खात्यात मोठी भरती; 10 वीच्या गुणांवर होणार उमेदवारांची निवड

Unlock4: खूशखबर! उद्यापासून करू शकणार राज्यांतर्गत रेल्वे प्रवास; बुकिंग सुरू करण्यास परवानगी

मोठा निर्णय! विठ्ठल रुक्मिणी मंदिर 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार 

BSNL ची धांसू ऑफर; प्रीपेड रिचार्जवर 600 रुपयांपर्यतचा अतिरिक्त टॉकटाईम

Web Title: Next time, the United States will not come to help; China Threat to India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.