आंद्रेच्या घरात आढळल्या आजारीशी संबंधित चिठ्ठ्या

By admin | Published: March 30, 2015 01:23 AM2015-03-30T01:23:15+5:302015-03-30T01:23:15+5:30

जर्मनविंग्ज विमानाच्या ( ए-३२०) अपघाताच्या तपासाची चक्रे सह-वैमानिक आंद्रे लुबित्झभोवती फिरत आहेत. २८ वर्षीय आंद्रे लुबित्झ हा नैराश्यग्रस्त, मनोरुग्ण होता,

Nick related to Andrea's illness found in the house | आंद्रेच्या घरात आढळल्या आजारीशी संबंधित चिठ्ठ्या

आंद्रेच्या घरात आढळल्या आजारीशी संबंधित चिठ्ठ्या

Next

बर्लिन : जर्मनविंग्ज विमानाच्या ( ए-३२०) अपघाताच्या तपासाची चक्रे सह-वैमानिक आंद्रे लुबित्झभोवती फिरत आहेत. २८ वर्षीय आंद्रे लुबित्झ हा नैराश्यग्रस्त, मनोरुग्ण होता, तसेच दृष्टिदोषही त्याला होता. यासंबंधीची फाटलेली कागदपत्रे त्याच्या घराच्या झडतीतपोलिसांना आढळली आहेत.
नैराश्य आणि मानसिक भीतीतून बळावलेल्या विकृतीमुळे तो हिंसक व्हायचा. त्यामुळे २००९ मध्ये त्याला वैमानिक प्रशिक्षण मध्यंतरीच सोडावे लागले होते. तो दृष्टिदोषावर उपचारही घेत होता, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचा दृष्टिदोष किती गंभीर होता, हे मात्र स्पष्ट झाले नाही. या दृष्टिदोषामुळेच त्याची मानसिक स्थिती बिघडली असावी, असे एका तपास अधिकाऱ्याचा कयास आहे. एकूणच त्याच्या घराच्या झडतीत आढळलेल्या कागदावरून तो आजारावर उपचार घेत असल्याचे दिसते. (वृत्तसंस्था)


 

Web Title: Nick related to Andrea's illness found in the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.