दक्षिण कॅरोलिनाच्या गव्हर्नरपदी निकी हॅले
By Admin | Published: November 6, 2014 03:11 AM2014-11-06T03:11:56+5:302014-11-06T03:11:56+5:30
दक्षिण कॅरोलिना प्रांताच्या गव्हर्नरपदी भारतीय अमेरिकन उमेदवार निकी हॅले यांची पुन्हा निवड झाली आहे.
वॉशिंग्टन : दक्षिण कॅरोलिना प्रांताच्या गव्हर्नरपदी भारतीय अमेरिकन उमेदवार निकी हॅले यांची पुन्हा निवड झाली आहे. रिपब्लिकन पक्षाच्या सदस्या असणाऱ्या निकी हॅले यांनी आपल्या डेमोक्रॅट प्रतिस्पर्ध्याचा पराभव केला. त्यामुळे रिपब्लिकन पक्षात त्यांचे महत्त्व वाढले आहे.
४२ वर्षांच्या निकी हॅले यांना ५७.८ टक्के मते मिळाली, त्यांच्या प्रतिस्पर्धी व्हिन्सेंट शेहीन यांना ४० टक्के मते आहेत. निकी हॅले या अमेरिकेतील दुसऱ्या भारतीय गव्हर्नर आहेत. रिपब्लिकन सदस्य व भारतीय उमेदवार बॉबी जिंदाल हे लुईसिनाचे गव्हर्नर आहेत.
निवडणुकीच्या प्रचारात फ्लोरिडाचे माजी गव्हर्नर जेब बुश, तसेच लुईसिना, न्यूजर्सीचे गव्हर्नर अनुक्रमे बॉबी जिंदाल व ख्रिस ख्रिस्ती यांनी निकी हॅले यांचा प्रचार केला होता. ४हॅले यांनी आपल्या प्रचारासाठी ८० लाख डॉलर जमवले होते, तर प्रतिस्पर्धी शेहीन यांनी ३५ लाख डॉलर जमवले होते. दक्षिण कॅरोलिनाच्या व्यापारी प्रतिनिधीबरोबर निकी हॅले पुढच्या महिन्यात भारतात येणार आहेत.