नायजेरियाला फायटर विमाने देणार!
By admin | Published: April 11, 2017 01:41 AM2017-04-11T01:41:46+5:302017-04-11T01:41:46+5:30
बोको हराममधील इस्लामिक दहशतवाद्यांच्या विरोधात वापरण्यासाठी अमेरिकेतर्फे नायजेरियाला उच्च श्रेणीची फायटर विमाने विकत देण्याचा मनसुबा ट्रम्प
Next
>ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन : बोको हराममधील इस्लामिक दहशतवाद्यांच्या विरोधात वापरण्यासाठी अमेरिकेतर्फे नायजेरियाला उच्च श्रेणीची फायटर विमाने विकत देण्याचा मनसुबा ट्रम्प प्रशासनाने रचला आहे. एक आठवड्याच्या आत या संदर्भात सूचना निघणार असल्याचे अमेरिकन अधिकार्यांनी सांगितले. या सौद्यानुसार ‘एम्ब्रार ए-२९ सुपर ट्युक्नो’ नावाची १२ फायटर विमाने ६00 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सला देण्यात येतील असे समजते.