नायजेरिया पोलिओग्रस्त देश नसल्याची घोषणा
By admin | Published: September 26, 2015 09:56 PM2015-09-26T21:56:57+5:302015-09-26T21:56:57+5:30
जागतिक आरोग्य संघटनेने (हू) नायजेरियाचे नाव पोलिओग्रस्त देशांच्या जागतिक यादीतून वगळले आहे. आफ्रिकेतील सर्वात दाट लोकसंख्येच्या या देशात एक वर्षापेक्षा जास्त
लागोस : जागतिक आरोग्य संघटनेने (हू) नायजेरियाचे नाव पोलिओग्रस्त देशांच्या जागतिक यादीतून वगळले आहे. आफ्रिकेतील सर्वात दाट लोकसंख्येच्या या देशात एक वर्षापेक्षा जास्त काळापासून पोलिओचा रुग्ण आढळलेला नाही.
नायजेरियन प्रशासनाने नियोजनपूर्वक राबविलेल्या पोलिओ निर्मूलन मोहिमेमुळे त्याला हे यश मिळाले. पोलिओग्रस्त देशांच्या यादीत आता केवळ पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोनच देशांची नावे उरली आहेत, असे हूने म्हटले आहे.
नायजेरियाला पोलिओग्रस्त देश नसल्याचे घोषित करताना ‘हू’ने म्हटले की ‘नायजेरियात पोलिओ विषाणूंच्या संसर्गाला प्रथमच अटकाव करण्यात आला आहे. त्यामुळे हा देश पोलिओमुक्त देश बनण्याच्या निकट पोहोचला आहे. नायजेरियात पोलिओचा अखेरचा रुग्ण २४ जुलै २०१४ रोजी आढळून आला होता. एखाद्या देशात १२ महिन्यांपर्यंत पोलिओचा रुग्ण आढळून न आल्यास त्या देशाचे नाव पोलिओग्रस्त देशांच्या यादीतून वगळण्यात येते. (वृत्तसंस्था)