NIKEने लाँच केला आपोआप लेस बांधली जाणारा शूज

By admin | Published: March 18, 2016 01:56 PM2016-03-18T13:56:57+5:302016-03-18T14:47:34+5:30

स्पोर्ट्स वेअरमध्ये नावाजलेला ब्रॅण्ड NIKE ने 'हायपरऍडॅप्ट 1.0' (HyperAdapt 1.0) या शूजचं न्यूयॉर्कमध्ये लाँचिंग केलं आहे

NIKE launches self-lace shoes | NIKEने लाँच केला आपोआप लेस बांधली जाणारा शूज

NIKEने लाँच केला आपोआप लेस बांधली जाणारा शूज

Next
>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. १८ - शूज घालायचं म्हणलं की अनेकजण लेस बांधायचा कंटाळा करतात. त्यामुळे लेस नसलेलेचं शूज घेण्यावर अनेकांचा भर असतो. पण शूजला लेसही असेल आणि ती तुम्हाला बांधावी लागणार नाही, तर आपोआप बांधली जाईल असं जर कोणी सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल काय ? नाही ना पण NIKE ने असा शूज लाँच केला आहे. जो तुम्ही घातलात की लेस आपोपाप बांधली जाणार आहे.
 
स्पोर्ट्स वेअरमध्ये नावाजलेला ब्रॅण्ड NIKE ने 'हायपरऍडॅप्ट 1.0' (HyperAdapt 1.0) या शूजचं न्यूयॉर्कमध्ये लाँचिंग केलं आहे. लॉचिंगवेळी NIKE ने आपल्या या पहिल्या Futuristic Self-Lacing (आपोआप लेस बांधली जाणार) 'हायपरऍडॅप्ट 1.0' ची पहिली झलक दाखवली आहे. याचा फायदा खेळाडू तसंच धावपटूंना होईल कारण यामुळे त्यांचं लक्ष विचलीत होणार नाही असं मत कंपनीने व्यक्त केलं आहे. 
 
या शूजला दोन बटण असणार आहेत ज्याच्या मदतीने शूजच फीटींग तुम्ही तुम्हाला हवं तसं करु शकता. पुढील महिन्यापासून या शूजची विक्री सुरु होण्याची शक्यता आहे. मात्र NIKEनं आतापर्यंत या बुटांची किंमत जाहीर केलेली नाही.
 

Web Title: NIKE launches self-lace shoes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.