नऊ भारतीय चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत; मी वसंतराव, RRR, गंगूबाई काठियावाडीचाही समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 07:07 AM2023-01-11T07:07:56+5:302023-01-11T07:08:12+5:30
‘रिमाइंडर’ यादीमध्ये चित्रपटांचा समावेश आहे, जे अधिकृतपणे विविध श्रेणींमध्ये इतर चित्रपटांशी स्पर्धा करतील.
लॉस एंजेलिस : ‘अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’ने (एएमपीएएस) ऑस्करसाठी पात्र असलेल्या ३०१ चित्रपटांची ‘स्मरण यादी’ (रिमाइंडर) प्रसिद्ध केली आहे. ज्यात ९ भारतीय चित्रपटांचा समावेश आहे.
‘रिमाइंडर’ यादीमध्ये चित्रपटांचा समावेश आहे, जे अधिकृतपणे विविध श्रेणींमध्ये इतर चित्रपटांशी स्पर्धा करतील. तथापि, केवळ यादीत असल्याने २४ जानेवारी रोजी जाहीर होणाऱ्या अकॅडमी अॅवॉर्ड्ससाठी चित्रपट अंतिम नामांकनात प्रवेश करेल की नाही, हे तेव्हाच कळेल. पण यानिमित्ताने भारतीय चित्रपटाला ऑस्कर मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
- आरआरआर
- गंगूबाई काठियावाडी
- चेलो शो
- द कश्मीर फाइल्स
- मी वसंतराव
- तुझ्यासाठी काही
- रॉकेटरी : द नंबी इफेक्ट
- कांतारा
- विक्रांत रोना
चार श्रेणींमध्ये प्रथमच निवड :
‘चेलो शो’, ‘आरआरआर’, ‘ऑल दॅट ब्रेथ्स’ आणि ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ या भारतीय चित्रपटांनी चार श्रेणींसाठी ऑस्करच्या शॉर्ट लिस्टमध्ये स्थान मिळवले आहे.