१०० प्रभावशाली महिलांंत निर्मला सीतारामन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 03:28 AM2019-06-26T03:28:50+5:302019-06-26T03:29:07+5:30
केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांचा ब्रिटन-भारत यांच्यातील १०० प्रभावशाली महिलांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. ब्रिटनच्या मंत्री पेनी मोरडॉन्ट यांनाही त्यात स्थान मिळाले आहे.
लंडन : केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांचा ब्रिटन-भारत यांच्यातील १०० प्रभावशाली महिलांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. ब्रिटनच्या मंत्री पेनी मोरडॉन्ट यांनाही त्यात स्थान मिळाले आहे.
ब्रिटनच्या संसदेत गृहमंत्री साजिद जाविद यांनी सोमवारी या यादीचे प्रकाशन केले. भारत व ब्रिटनचे संबंध आणखी दृढ करण्यासाठी निर्मला सीतारामन यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याने त्यांचे नाव या यादीत समाविष्ट केले आहे. लंडन स्कूल आॅफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेतलेल्या निर्मला सीतारामन यांनी त्यानंतर काही काळ ब्रिटनमध्ये नोकरीही केली होती. त्यामुळे भारतातील अन्य केंद्रीय मंत्र्यांपेक्षा सीतारामन यांनी ब्रिटन अधिक परिचयाचा आहे असेही या यादीत त्यांची ओळख करून देताना म्हटले आहे.